भारताकडून प्रेरित होण्याची गरज नाही- महिरा खान

वृत्तसंस्था
शनिवार, 31 डिसेंबर 2016

व्हिडिओत म्हटले आहे...
व्हिडिओमध्ये ""भारतातील कोणतीही मुलगी तुझ्यासारखी सुंदर दिसत नाही. मी फक्त पाकिस्तानलाच प्रमोट करण्याचे ठरविले असून, तू पाकिस्तानी असल्याने माझ्यासाठी महत्त्वाची वाटते. बॉलिवूडला मी कोळून प्यायलो आहे'' असे उमर महिराला म्हणत आहे. यावर महिरा ""तुम्हाला भारतापासून प्रेरित होण्याची गरज नाही.'' असे म्हणत उमरच्या सुरात सूर मिळविताना दिसत आहे.

नवी दिल्ली - पाकिस्तानला भारताकडून प्रेरणा घेण्याची काहीएक गरज नाही, असे वक्तव्य अभिनेत्री महिरा खान हिने केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शाहरुखच्या आगामी "रईस' या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत असलेल्या महिराचे हे वक्तव्य समोर आल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे.

सोनम महाजन या मुलीने संबंधित व्हिडिओ ट्विटरवर टाकला आहे ""जे कोणी रईस पाहायला जाणार आहेत, त्यांनी स्वतःचा स्वाभिमान विकून तो पाहायला जावे'' असे सोनमने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. हा व्हिडिओ 2011 मध्ये झालेल्या एका चॅट शोचा असून, त्यात महिरा हास्यकलाकार उमर शरीफ याच्या वक्तव्याशी सहमती दर्शवताना दिसत आहे.

उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांना भारतीय चित्रपटात घेऊ नये, असा पवित्रा अनेकांनी घेतला आहे. रईसवरून वाद निर्माण झाल्यानंतर शाहरुख खानने मनसेप्रमुख राज ठाकरे यांची नुकतीच भेट घेतली होती. चित्रपट प्रदर्शनाला त्यांच्याकडून होकार मिळाल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. चित्रपटात महिराने शाहरुखच्या पत्नीची भूमिका साकारली असून, हा चित्रपट 25 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.

व्हिडिओत म्हटले आहे...
व्हिडिओमध्ये ""भारतातील कोणतीही मुलगी तुझ्यासारखी सुंदर दिसत नाही. मी फक्त पाकिस्तानलाच प्रमोट करण्याचे ठरविले असून, तू पाकिस्तानी असल्याने माझ्यासाठी महत्त्वाची वाटते. बॉलिवूडला मी कोळून प्यायलो आहे'' असे उमर महिराला म्हणत आहे. यावर महिरा ""तुम्हाला भारतापासून प्रेरित होण्याची गरज नाही.'' असे म्हणत उमरच्या सुरात सूर मिळविताना दिसत आहे.

Web Title: Raees actor Mahira Khan: Pakistanis shouldn't be inspired by India and Bollywood