हिमाचलच्या पर्वतरांगांत राफेल विमानांचा सराव

rafael
rafael

नवी दिल्ली - भारतीय हवाईदलाच्या ताफ्यात नव्याने दाखल झालेल्या राफेल या लढाऊ विमानांनी हिमाचल प्रदेशाच्या पर्वतरांगांमध्ये रात्रीच्या उड्डाणांचा सराव सुरू केला आहे. लडाख सीमेवरील परिस्थिती चिघळली आणि तेथे गरज भासल्यास सज्ज राहण्याच्या दृष्टीने हा सराव सुरू केला आहे. 

राफेलची पहिली तुकडी २९ जुलै रोजी भारतात दाखल झाली. या पहिल्या तुकडीत पाच विमाने आहेत. गोल्डन अॅरो  या स्क्वाड्रनमध्ये त्यांचा समावेश करण्यात आला आहे. या विमानांची पहिली स्क्वाड्रन अंबाला येथे तर दुसरी भूतान सीमेजवळील हाशिमारा येथे असणार आहे. पहिल्या तुकडीतील विमानांनी रात्रीचा सराव सुरू केल्याचे वृत्त काही इंग्रजी माध्यमांनी दिली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अक्साई चीनमधील चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या रडारना राफेलची माहिती मिळू नये यासाठी त्यांना सध्या नियंत्रण रेषेपासून दूर ठेवले आहे. लडाख विभागामध्ये प्रशिक्षणासाठी राफेल विमानांचा वापर करता येऊ शकतो असे तज्ज्ञांचे मत आहे. 

चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने अक्साई चीनमध्ये डोंगरात उंचावर सिग्नल पकडण्यासाठी इलेक्ट्रॉनिक इंटेलिजन्स रडार बसवले आहेत. पण युद्धाच्या प्रसंगात सिग्नल सिन्गेचर बदलण्याची क्षमता राफेल विमानांमध्ये असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

राफेलमधली शस्त्रे त्याला सर्वाधिक घातक बनवतात. या विमानांमध्ये हवेतून हवेत मारा करणारी मिटिओर, हवेतून जमिनीवरच्या लक्ष्याचा वेध घेणारी स्काल्प क्षेपणास्त्रे आहेत. मिटिओरचा पल्ला १५० किलोमीटर तर स्काल्पचा पल्ला ३०० किलोमीटर आहे

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com