सीतारामन संरक्षणमंत्री नाहीतर 'राफेलमंत्री' : राहुल गांधी

Rafale minister Nirmala Sitharaman a liar, must resign, says Rahul Gandhi
Rafale minister Nirmala Sitharaman a liar, must resign, says Rahul Gandhi

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी राफेल करारावरून संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर टीकास्त्र सोडले. राहुल गांधींनी संरक्षणमंत्र्यांचा उल्लेख 'राफेलमंत्री' म्हणून केला. तसेच राफेल कराराबाबत अनियमितता असल्याने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीच केली आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना राहुल गांधींनी संरक्षणमंत्र्यांवर निशाणा साधला. ते म्हणाले, ''भ्रष्टाचाराचे रक्षण करण्यासाठी कार्यरत आहेत. राफेल करारावर त्या पुन्हा एकदा खोटे बोलत आहेत. त्यांचे स्थान अस्थिर असे आहे. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यायलाच हवा''. राफेलबाबत 'हिंदुस्तान अॅरोनॉटिक्स लिमिटेड'चे माजी प्रमुख टी. एस. राजू यांनी सांगितले होते, की राफेल लढाऊ विमानाची निर्मिती भारतामध्ये करता येऊ शकते आणि हिंदुस्तान अॅरोनॉटिक्स लिमिटेड यासाठी सक्षम होते. 

या मुद्दावरून राहुल गांधी पुढे म्हणाले, ''हिंदुस्तान अॅरोनॉटिक्स लिमिटेडचे माजी प्रमुख टी. एस. राजू त्यांच्याशी (सीतारामन) खोटे बोलले, की हिंदुस्तान अॅरोनॉटिक्स लिमिटेड राफेल निर्मितीसाठी सक्षम नाही. या सर्वामुळे सीतारामन यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यायलाच हवा''.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com