रघुराम राजन होणार बॅंक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर?

वृत्तसंस्था
बुधवार, 12 जून 2019

लंडन: भारताचे माजी रिझर्व्ह बॅंक गव्हर्नर रघुराम राजन यांचे नाव बॅंक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदाच्या शर्यतीत आहे. राजन सचोटीचे अर्थतज्ज्ञ म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध आहेत. त्यांच्या प्रदिर्घ कारकिर्दीमध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी त्याचबरोबर भारतीय रिझर्व्ह बॅंक यासारख्या महत्त्वाच्या संस्थांमध्ये जबाबदारी सांभाळली आहे. त्यावेळी आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी आणि कडक धोरणांसाठी ते चर्चेत असायचे. प्रसंगी अनेकवेळा त्यांनी सत्ताधाऱ्यांची नाराजीही ओढवून घेतली होती.

आता ब्रेक्झिटने त्रस्त असलेला ब्रिटन हा बॅंक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरच्या रुपाने रघुराम राजन यांचे खडे बोल ऐकण्यासाठी तयार आहे का ? हा प्रश्न या निमित्ताने उभा राहिला आहे. बॅंक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदाच्या शर्यतीत असणाऱ्यांमध्ये फक्त रघुराम राजनच ब्रिटनबाहेरील आहेत. सध्या मार्क कार्नी यांच्याकडे बॅंक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदाची जबाबदारी आहे. बॅंक ऑफ इंग्लंड ही 325 वर्ष जुनी अर्थसंस्था आहे. कार्नी यांच्या कारकिर्दीवर मुख्यत: ब्रेक्झिटचे मोठेच सावट पडले आहे.

ब्रेक्झिटच्या संदर्भातील बॅंक ऑफ इंग्लंडच्या धोरणांवर टिकाही झाली आहे. नुकताच थेरेसा मे यांनीसुद्धा इंग्लंडच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. राजन यांच्याबरोबर अॅंड्रू बॅले यांचे नावही स्पर्धेत अग्रस्थानी आहेत. 56 वर्षांचे राजन सध्या शिकागो येथील बूथ स्कूल ऑफ बिझनेस इथे प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत. युके ट्रेझरीकडून नव्या गव्हर्नरची नियुक्ती होणार आहे. रघुराम राजन यांची चांगली कारकिर्द हि त्यांची जमेची बाजू आहे. 2003 ते 2006 दरम्याने ते आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्य अर्थतज्ज्ञ होते. रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर होण्याआधी ते भारत सरकारचे आर्थिक सल्लागार होते. आरबीआयचे गव्हर्नर असताना राजन यांनी बॅंकांच्या थकित कर्जाचा निपटारा करण्यावर भर दिला होता.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raghuram Rajan top contender in race to lead 3Bank of England