esakal | 'मनरेगा मॅन'ला पंतप्रधान मोदीनींही वाहिली श्रद्धांजली
sakal

बोलून बातमी शोधा

 raghuvansh prasad singh, pm modi

बिहारचे दिग्गज नेता श्रीमान रघुवंश प्रसाद सिंह आपल्यामधून निघून गेले. मी त्यांना अभिवादन करतो. रघुवंश बाबू यांच्या जाण्याने बिहार तेसच देशाच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे, असे मोदींनी म्हटले आहे.

'मनरेगा मॅन'ला पंतप्रधान मोदीनींही वाहिली श्रद्धांजली

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

माजी केंद्रीय मंत्री रघुवंश प्रसाद सिंह यांनी दिल्ली येथील एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते.  तीन दिवसांपूर्वी रुग्णालयात असतानाच त्यांनी एका पत्राच्या माध्यमातून  राष्‍ट्रीय जनता दल (आरजेडी) पक्षातून राजीनामा दिला होता. सायंकाळपर्यंत त्यांचे पार्थिव बिहारमध्ये नेण्यात येणार असून सोमवारी त्यांच्याव अंत्यसंस्कार करण्यात येतील.  

माजी केंद्रीय मंत्री रघुवंश प्रसाद सिंह यांचे निधन; एम्स रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील रघुवंश प्रसाद सिंह यांच्या निधनानंतर दुख व्यक्त केले आहे. बिहारचे दिग्गज नेता श्रीमान रघुवंश प्रसाद सिंह आपल्यामधून निघून गेले. मी त्यांना अभिवादन करतो. रघुवंश बाबू यांच्या जाण्याने बिहार तेसच देशाच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे, असे मोदींनी म्हटले आहे. एवढेच नाही तर रघुवंश प्रसाद सिंह यांनी लिहिलेल्या अखेरच्या पत्रातील भावना पूर्ण केल्या जातील, असेही मोदींनी म्हटले आहे. रघुवंश प्रसाद यांनी पत्राच्या माध्यमातून बोलून दाखवलेल्या गोष्टींची पूर्तता करण्यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांना सहकार्य करु, असा उल्लेख करत मोदींनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 

घाई गडबड केल्यानं चीन पडलं तोंडावर; लाँचिंगवेळी सॅटेलाइट भरकटल्याने क्रॅश

आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्यासह तेजस्वी यादव यांनी देखील या घटनेवर शोक व्यक्त केलाय.  पक्षाचे प्रेरणास्त्रोत आणि गरिबांचा आवाज बनणाऱ्या रघुवंश बांबूचे दु:खद निधन झाले. गरिबांची काळजी, त्यांच्यासंदर्भात त्यांनी राबवलेली धोरण, सिद्धांत हे पक्षाला नेहमीच प्रेरणा देत राहिल, अशा शब्दांत विरोधी पक्षाचे नेत तेजस्वी यादव यांनी रघुवंश प्रसाद सिंह यांना श्रद्धांजली वाहिली.