मोदीजी, 'सहारा'च्या पाकिटांमध्ये काय होते?- राहुल गांधी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 23 डिसेंबर 2016

बहराईच (उ. प्रदेश) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आज सलग दुसऱ्या दिवशी हल्ला चढवत कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांच्यावर सहारा समूहाकडून दलालीचे पैसे घेतल्याच्या आरोपांचा पुनरुच्चार केला. मी मोदींच्या गैरव्यवहारावर बोलल्यानंतर माझ्या वक्तव्यांची खिल्ली उडविण्यात आली. त्यांनी माझी कितीही खिल्ली उडवली तरी हरकत नाही; पण त्यांना देशातील तरुणांना उत्तर द्यावेच लागेल. गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदींना "सहारा' समूहाकडून मिळालेल्या दहा पाकिटांमध्ये काय होते, हे त्यांनी आम्हाला सांगावे, असे राहुल यांनी नमूद केले.

बॅंकांसमोर लागलेल्या रांगांमध्ये चोर उभे नसून तेथे प्रामाणिक मंडळी आहेत. या मंडळींकडे कोणताही काळा पैसा नाही. तुमच्यासोबत विमानांतून प्रवास करणाऱ्यांकडे काळा पैसा आहे. मोदींनी काळ्या पैशांविरोधात सर्जिकल स्ट्राइक केलेला नसून, तो देशातील जनतेवर केलेला हल्ला आहे, असे टीकास्त्र राहुल यांनी सोडले. नोटाबंदीच्या निर्णयाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे, कारण कृषीउपयोगी साहित्याची खरेदी करण्यासाठी शेतकरी पैसे मोजत असतो, येथे तो चेकने व्यवहार करत नाही, असेही त्यांनी सांगितले.

राहुल म्हणाले...

  • टीव्हीवर झळकण्यासाठी मोदी लाखो रुपये मोजतात
  • देशातील 50 कुटुंबांचा मोदींना आर्थिक पाठिंबा
  • श्रीमंतांसाठी मोदींनी गरिबांचे पैसे बॅंकांत टाकले
  • नोटाबंदी गरीब, शेतकरी आणि मजुरांविरोधात
  • कॅशलेस व्यवस्था हवी; पण तिची बळजबरी नको
Web Title: rahul asks modi about sahara kickbacks