पाकिस्तानलाच दोष का देता : राहुल गांधी

वृत्तसंस्था
सोमवार, 12 डिसेंबर 2016

नवी दिल्ली ः पाकिस्तान भारतात फूट पाडू इच्छित आहे, या गृहमंत्री राजनाथसिंह यांनी केलेल्या विधानाचा कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी परखड भाषेत समाचार घेतला.

फक्त पाकिस्तानलाच दोष का देता, तुम्ही व तुमचे बॉस (नरेंद्र मोदी) सुद्धा तेच करत आहात, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे. जातीपातीच्या धर्तीवर भारतात फूट पडावी, यासाठी पाकिस्तान प्रयत्नशील आहे, हे मला मान्य आहे. मात्र, तुम्हीही तेच करत आहात, असे तुम्हाला वाटत नाही का, असा प्रश्न राहुल गांधी यांनी ट्विटरद्वारे उपस्थित केला आहे.

Web Title: rahul asks why to blame pakistan