नरेंद्र मोदींच्या गॅसपाईपच्या वक्तव्याची राहूल गांधीकडून खिल्ली 

वृत्तसंस्था
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

गटारातून निघणाऱ्या गॅसवर चहा बनवणाऱ्याचा किस्सा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका कार्यक्रमात सांगितला होता, आज (ता.13) काँग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी यांनी मोदींच्या या वक्तव्याची चांगलीच खिल्ली उडवली. देशातल्या दोन कोटी युवकांना रोजगार देण्याचे आश्वासन देणाऱ्या पंतप्रधानांची हीच रोजगार नीती आहे, अशी उपहासात्मक टीकाही त्यांनी यावेळी केली.

बंगळुरू- गटारातून निघणाऱ्या गॅसवर चहा बनवणाऱ्याचा किस्सा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका कार्यक्रमात सांगितला होता, आज (ता.13) काँग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी यांनी मोदींच्या या वक्तव्याची चांगलीच खिल्ली उडवली. देशातल्या दोन कोटी युवकांना रोजगार देण्याचे आश्वासन देणाऱ्या पंतप्रधानांची हीच रोजगार नीती आहे, अशी उपहासात्मक टीकाही त्यांनी यावेळी केली.

एका चहावाल्याचं उदाहरण देणारा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओतील मोदींच्या विधानांवर राहुल गांधींनी जोरदार टीका केली आहे. 'नाल्यातून निघणाऱ्या गॅसच्या मदतीनं रोजगार देण्याची योजना मोदी तयार करत आहेत. आधी मोदींनी दोन कोटी तरुणांना रोजगार देण्याचं आश्वासन दिलं होतं. आता मोदी तरुणांना भजी तळण्याचा सल्ला देत आहेत, असेही ते म्हणाले. 

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका कार्यक्रमात एका चहावाल्याचा किस्सा सांगितला होता. एका शहरात एक व्यक्ती चहा विकतो. त्या व्यक्तीच्या दुकानाच्या बाजूने एक गटार वाहते. त्या चहावाल्याने एका छोटं भांडं उलटं करून गटारावर ठेवले आणि गटारातून जो गॅस निघतो त्यातून तो चहा बनवतो, असे मोदींनी सांगितले होते, त्यांच्या या वक्तव्यावर राहुल गांधी यांनी टीका केली आहे. तसेच, मोदींच्या धोरणांचा फायदा फक्त 15-20 लोकांनाच झालेला आहे आणि मोदी देशातील युवकांना भजी तळण्याचा सल्ला देत आहेत अशी टीकाही राहूल गांधी यांनी यावेळी केली.

Web Title: rahul gandghi criticise on modi in banglore