बादलांमुळे पंजाबी युवक व्यसनाधीन- राहुल गांधी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 27 जानेवारी 2017

चंदीगड- पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांनी राज्यातील 70 टक्के युवकांना व्यसनाधीन केले आहे, असा आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (शुक्रवार) केला आहे.

एका रॅलीदरम्यान बोलताना गांधी म्हणाले, 'शेतकरी जेंव्हा 'बादल' (ढग) पाहतो तेंव्हा त्यांना आनंद होतो. परंतु, पंजाबमधील शेतकऱयांना 'बादल' पाणी देत नाही. बादलांना पाहून शेतकरी खुष होत नाही. युवकांबद्दल तर बोलायलाच नको. राज्यातील नागरिकच सांगतात की, 70 टक्के युवकांना बादलांनी व्यसनाधीन केले आहे. राज्यात काँग्रेसचे सरकार आल्यानंतर व्यसानाच्या विरोधात कायदा करू.'

'पंजाबमध्ये कोठेही प्रवास करताना बादल यांच्या बसमधून जावे लागते. प्रत्येक क्षेत्रात बादल अधिकार गाजवताना दिसत आहेत. परंतु, विधानसभा निवडणूकीमध्ये संपूर्ण चित्र बदलेल. काँग्रेसला बहुमत मिळेल व राज्याचे मुख्यमंत्री म्हणून अमरिंदरसिंह असतील,' असेही गांधी म्हणाले.

Web Title: rahul gandhi addressing a rally in punjab