लहान बाळाला समजेल, पण राहुलला समजणार नाही- जेटली

वृत्तसंस्था
बुधवार, 2 जानेवारी 2019

संसद सभागृहात राफेल करारावरुन चांगलाच गदारोळ माजला आहे. राहुल गांधींच्या आक्रमक भाषणानंतर, अर्थमंत्री अरुण जेटलींनी राहुल गांधींवर जोरदार प्रहार केलेला पहायला मिळाला. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सातत्याने खोटं बोलत आहेत. एखाद्या लहान बाळाला समजेल पण राहुल गांधीना समजणार नाही अशा शब्दात जेटलींनी राहुल गांधीवर प्रहार केला आहे.

नवी दिल्ली- संसद सभागृहात राफेल करारावरुन चांगलाच गदारोळ माजला आहे. राहुल गांधींच्या आक्रमक भाषणानंतर, अर्थमंत्री अरुण जेटलींनी राहुल गांधींवर जोरदार प्रहार केलेला पहायला मिळाला. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सातत्याने खोटं बोलत आहेत. एखाद्या लहान बाळाला समजेल पण राहुल गांधीना समजणार नाही अशा शब्दात जेटलींनी राहुल गांधीवर प्रहार केला आहे.

जेटली म्हणाले की, राहुल यांचं प्रत्येक वाक्य न्यायालयाचा अपमान करणारे आहे. जो पक्ष अनेक दिग्गजांनी चालवला, त्या पक्षाच्या आजच्या अध्यक्षांना कॉम्बॅट एअरक्राफ्ट काय असतं हे सुद्धा माहित ही दुर्दैवाची बाब असल्याचे जेटली म्हणाले. देशात काही लोक आणि कुटुंब असे आहेत, ज्यांना पैशाचं गणित बरोबर समजतं पण, देशाच्या सुरक्षेबद्दल त्यांना देणं घेणं नाही. असा प्रतिहल्ला अरुण जेटली यांनी केला.

दरम्यान, बोफर्स, नॅशनल हेरॉल्ड आणि अगुस्ता वेस्टलँड घोटाळ्यात ज्यांच्याकडे बोट दाखवलं गेलं ते आज राफेलवर संशय घेतात, असेही जेटलींनी म्हटले. पुढे व्हायरल झालेल्या क्लिपसंबंधी बोलताना ते म्हणाले की, ऑडिओ क्लिप ही बनावट असल्यामुळे राहुल गांधी घाबरत आहेत. गोव्याचे मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांनी ती ऑडिओ क्लिप खोटी असल्याचे म्हटले आहे. राहुल गांधी यांचे आरोप सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले असून मागच्या सहा महिन्यात राफेलबद्दल बोलण्यात आलेला प्रत्येक शब्द चुकीचा असल्याचे त्यांनी सांगितले.

काही लोकांना सत्य बोललेले आवडत नाही. राहुल गांधींना फायटर विमानांबद्दल काय कळतं? काँग्रेस अध्यक्षांना फक्त पैसा कळतो, त्यांना देश आणि देशाची सुरक्षा कधीही समजणार नाही. कारगिल युद्धानंतर हवाई दलाला राफेल विमानांची गरज निर्माण झाली होती. कारगिल युद्धाच्यावेळी आपल्याकडे राफेल विमाने असती तर 100 ते 150 मीटर अंतरावरुन आपल्याला अचूक क्षेपणास्त्र हल्ला करता आला असता, असे जेटली यांनी यावेळी सांगितले.

Web Title: Rahul Gandhi Arun Jaitley Clash Over Rafale In Parliament