कॉंग्रेसच्या जहाजाचे अमरिंदरसिंगच कप्तान

वृत्तसंस्था
शनिवार, 28 जानेवारी 2017

राहुल गांधी यांची घोषणा; केजरीवालांवरही घणाघात

अमृतसर: पंजाबमध्ये कॉंग्रेसला पुन्हा सत्ता मिळाली, तर कप्तान अमरिंदरसिंग हेच आमचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असतील, असे कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज येथील सभेत बोलताना जाहीर केले.

अमरिंदर हेच एकटे पंजाबचे चित्र बदलवू शकतात, राज्यातील जनतेसमोर दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही, असेही राहुल यांनी नमूद केले. दरम्यान, मागील काही दिवसांपासून शिरोमणी अकाली दल आणि आम आदमी पक्ष अमरिंदर यांच्यावर सातत्याने टीका करत असून, कॉंग्रेस त्यांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून का जाहीर करत नाही? असा सवालही या दोन्ही पक्षांकडून विचारला जात होता. पंजाबमध्ये बाहेरचा उमेदवार लादला जाणार नाही, येथील माणूसच राज्याचा सूत्रधार असेल. या राज्यासाठी रिमोट कंट्रोलची आवश्‍यकता नसल्याचे सांगत त्यांनी केजरीवाल यांच्यावरही टीका केली.

राहुल म्हणाले

  • केजरीवाल दोन राज्यांचे मुख्यमंत्री बनू पाहत आहेत
  • कॉंग्रेस पक्षच "पंजाबियत'चे संरक्षण करेल
  • राज्यातील कायदा-सुव्यवस्था मजबूत करू
  • अमली पदार्थांचा व्यापार करणाऱ्यांच्या मुसक्‍या आवळू
  • बादल कुटुंबाने राज्याची वाट लावली
Web Title: rahul gandhi attack on arvind kejriwal