मोदींशी सहमत नसणाऱ्यांना भारतात जागा नाही : राहुल

वृत्तसंस्था
शुक्रवार, 7 एप्रिल 2017

नवी दिल्ली: अलवार येथे घडलेल्या घटनेवरून कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला लक्ष्य केले. मोदी आणि संघाशी सहमत नसणाऱ्यांना या देशात जागा नाही आणि ज्या वेळी सरकार जबाबदारी झटकते, तेव्हा अलवारसारख्या घटना मोठ्या प्रमाणात घडतात, अशी टीका राहुल यांनी केली.

अलवार येथे गायी नेत असताना एका मुस्लिम व्यक्तीची हत्या करण्यात आली होती. रमजान ईद येणार म्हणून दुभत्या गायी आणण्यासाठी पेहलू खान राजस्थानमध्ये आला होता. त्याची गैरसमजातून हत्या करण्यात आली. या घटनेचा संदर्भ घेत हल्लाबोल करताना राहुल गांधी म्हणाले, की पंतप्रधान एका स्वप्नाचा प्रसार करत आहेत, ज्याठिकाणी केवळ एकाच्याच विचारांचे प्रभुत्व असेल आणि अन्य कोणाचे विचार, तसेच नरेंद्र मोदी किंवा संघाशी जे सहमत नसतील किंवा त्यांचे ऐकले नाही, तर त्यांना भारतात जागा नसेल. हेच त्यांचे स्वप्न आहे.

अलवार येथील घटनेचा उल्लेख करून ते म्हणाले, की हे ते काय करत आहेत; देशासाठी अशा घटनांचे अतिशय गंभीर परिणाम भोगावे लागतील. त्यांच्या विचारांवर विश्‍वास नसलेल्यांना देशात जागा द्यायची नाही, अशा पद्धतीने ते विचार करत आहेत. अलवारमधील हल्ला क्रूर आणि मूर्खपणा असून, राजस्थान सरकार दोषींविरुद्ध कठोर कारवाई करेल, अशी अपेक्षा असल्याचे ट्‌विटही राहुल यांनी केले.

Web Title: rahul gandhi attack on narendra modi