Rahul Gandhi : भारत जोडोमध्ये सुरक्षेत हयगय? केंद्र सरकार म्हणतं, राहुल गांधींनीच... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul Gandhi

Rahul Gandhi : भारत जोडोमध्ये सुरक्षेत हयगय? केंद्र सरकार म्हणतं, राहुल गांधींनीच...

नवी दिल्ली - काँग्रेसनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सध्या भारत जोडा यात्रा सुरू आहे. मात्र या यात्रेत राहुल गांधी यांच्या सुरक्षेत हयगय झाल्याचा आरोप काँग्रेसकडून कऱण्यात आला आहे. याबाबत काँग्रेसकडून केंद्र सरकारला पत्रही पाठविण्यात आलं होत. मात्र केंद्र सरकारने सुरक्षेत झालेल्या हयगयसाठी राहुल गांधी हेच जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. (Rahul Gandhi news in Marathi)

हेही वाचा: Video : पुण्यात 'मुळशी पॅटर्न' कायम? कोयत्याचा धाक दाखवत टोळक्याची दहशत

काही दिवसांपूर्वी काँग्रेसकडून केंद्रीय गृहमंत्रालयााला सुरक्षेत हयगयी झाल्याचं पत्र पाठविण्यात आलं होतं. त्याला केंद्रीय गृहमंत्रालयाने उत्तर दिलं असून राहुल गांधी यांनीच सुरक्षेचे नियम मोडल्याचं म्हटलं. राहुल गांधी यांच्या यात्रेचा पुढचा टप्पा संवेदनशील भागातून जाणार असल्याने अधिक सुरक्षा पुरवावी, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे.

काँग्रेसने पत्रात म्हटलं होतं की, राहुल गांधी यांच्या सुरक्षेसाठी एक सुरक्षा कडं असतं. मात्र २४ डिसेंबर रोजी भारत जोडो जेव्हा दिल्लीत दाखल झाली, तेव्हा मात्र सुरक्षा व्यवस्थेत गैरव्यवस्था झाली होती. तेव्हा पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली होती.

हेही वाचा क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

हेही वाचा: Maharashtra Politics : तुमच्या कर्तृत्वाला सलाम, फक्त....; ठाकरे गटाचं शिंदे गटाला चॅलेंज

दरम्यान केंद्र सरकारने उत्तर देताना म्हटलं राहुल गांधींना झेड प्लस सुरक्षा आहे. त्यानुसार केंद्रीय राखीव दल त्या-त्या राज्याशी चर्चा करून सुरक्षा पुरवत असते. या सुरक्षेच्या आधी मॉक ड्रील होत असते, तीही झाली होती. त्यामुळे सुरक्षेत कुठंही चूक झाली नसल्याचं केंद्रीय मंत्रालयाने म्हटलं.

दरम्यान राहुल गांधी यांनी २०२० पासून ११३ वेळा सुरक्षा प्रोटोकॉलचं उल्लंघन केल्याचं केंद्र सरकारने पत्रात नमूद केलं आहे. तसेच ज्यांना सुरक्षा पुरवण्यात येते ते सुरक्षेच्या नियमांचं पालन करत असतील तर सुरक्षा आणखी मजबूत होते, असंही केंद्र सरकारने म्हटलं आहे.