कर्नाटकात राहुल गांधींचा बैलगाडी मोर्चा

वृत्तसंस्था
सोमवार, 7 मे 2018

कोलार (कर्नाटक) : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज कर्नाटकातील कोलार येथे पेट्रोल-डिझेलच्या भाववाढीविरोधात बैलगाडीवरून मोर्चा काढत आंदोलन केले. यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधत वाढत्या महागाईवर टीका केली. 2014 पासून आतापर्यंत भाजप सरकारने 10 लाख कोटी कर जमा करूनही जनतेच्या पदरी निराशाच आली आहे, असे यावेळी राहूल गांधी म्हणाले.   

पेट्रोल, डिझेल व एलपीजीच्या वाढत्या किंमती बघून मोदींनी दिलेल्या 'अच्छे दिन'चा नारा देणारे हे सरकार आता का गप्प आहे, असा सवाल राहूल यांनी केला. राहूल गांधींनी ट्विटरवर एका जाहिरातीचा व्हिडीओ शेअर केला, ज्यात यापूर्वी सरकारने दिलेली आश्वासने दाखवलेली आहेत. 'भाजप सरकारने पेट्रोल, डिझेल व एलपीजीच्या करातून साधारण 10 लाख कोटी जमा केले, पण याचा मोबदला म्हणून नागरिकांना फक्त निराशाच मिळाली आहे. या आकाशाला भिडणाऱ्या किंमतींबाबत मोदी सरकार काही बोलताना दिसत नाही.' 

कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार आहे, 12 मे रोजी येथे मतदान होईल 15 मे ला निकाल लागतील, सध्या काँग्रेसचे सिध्दरामैय्या हे मुख्यमंत्री आहेत.  

Web Title: rahul gandhi bullock cart rally in karnatak