'राहुल गांधी यांच्यात पंतप्रधान होण्याचे गुण' 

वृत्तसंस्था
सोमवार, 31 डिसेंबर 2018

दिल्लीत उभारणार स्वागत कमानी 
नवी दिल्ली : दिल्लीच्या हद्दीवरील बारा तपास नाक्‍यांजवळ पुढील वर्षीपर्यंत स्वागत कमानी उभारण्याचा निर्णय दिल्ली सरकारने घेतल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी आज सांगितले. नोएडा, गाझियाबाद, फरिदाबाद, सोनिपत, खारखोडा, बहादूरगड, बाडली, कुंडी आणि गाझीपूर ही त्या ठिकाणांपैकी प्रमुख नावे आहेत. राजधानीत प्रवेश करणाऱ्या नागरिकांना प्रवेशद्वार आकर्षक वाटून शहराबद्दल सकारात्मक भावना निर्माण व्हावी, हा त्यामागील उद्देश असल्याचे सिसोदिया यांनी सांगितले. 

नवी दिल्ली : राहुल गांधी यांच्यात उत्तम पंतप्रधान होण्यास आवश्‍यक असलेले सर्व गुण आहेत, अशी स्तुतीसुमने कॉंग्रेस नेते शशी थरूर यांनी आपल्या पक्षाध्यक्षांवर उधळली आहेत. अर्थात, कॉंग्रेसचा पंतप्रधानपदाचा उमेदवार 2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर सर्वांशी चर्चा करूनच ठरेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

"तीन राज्यांमधील निकालामुळे कॉंग्रेस हाच एकमेव योग्य पर्याय असल्याचे स्पष्ट झाले आहे. आमच्या पक्षाचे देशात सर्वत्र अस्तित्व असल्याने राष्ट्रीय आघाडीसाठीही हाच पक्ष योग्य आहे. कॉंग्रेसला या निवडणुकीत बहुमत मिळाल्यास राहुल गांधी हेच आमचे नेते असतील. कॉंग्रेससह आघाडी सरकार स्थापन झाल्यास सर्वांशी चर्चा करून उमेदवार ठरविला जाईल,' असेही थरूर पत्रकारांशी बोलताना म्हणाले. 

दिल्लीत उभारणार स्वागत कमानी 
नवी दिल्ली : दिल्लीच्या हद्दीवरील बारा तपास नाक्‍यांजवळ पुढील वर्षीपर्यंत स्वागत कमानी उभारण्याचा निर्णय दिल्ली सरकारने घेतल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी आज सांगितले. नोएडा, गाझियाबाद, फरिदाबाद, सोनिपत, खारखोडा, बहादूरगड, बाडली, कुंडी आणि गाझीपूर ही त्या ठिकाणांपैकी प्रमुख नावे आहेत. राजधानीत प्रवेश करणाऱ्या नागरिकांना प्रवेशद्वार आकर्षक वाटून शहराबद्दल सकारात्मक भावना निर्माण व्हावी, हा त्यामागील उद्देश असल्याचे सिसोदिया यांनी सांगितले.

Web Title: Rahul Gandhi Can Make An Excellent Prime Minister: Shashi Tharoor