'राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकत नाही'

वृत्तसंस्था
शनिवार, 12 जानेवारी 2019

''राहुल गांधींना पंतप्रधान होता आले असते. तेव्हा ते पंतप्रधान झाले नाहीत. आता काही केलं तरी राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकत नाही''.

- नीलेश राणे, माजी खासदार

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीत विरोधीपक्षांकडून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पंतप्रधानपदाचे उमेदवार असणार की नाहीत, याबाबत चर्चा सुरु आहेत. त्यानंतर आता माजी खासदार नीलेश राणे यांनी राहुल गांधींवर ट्विटरवरून निशाणा साधला. ते म्हणाले, ''राहुल गांधींना पंतप्रधान होता आले असते. तेव्हा ते पंतप्रधान झाले नाहीत. आता काही केलं तरी राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकत नाही''.

संयुक्त पुरोगामी आघाडीकडून (यूपीए) राहुल गांधी यांचे नाव पंतप्रधानपदासाठी पुढे केले जाण्याची शक्यता आहे. मात्र, तत्पूर्वी आता नीलेश राणे यांनी याबाबत ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी सांगितले, की ''जेव्हा राहुल गांधींना पंतप्रधान होता आले असते तेव्हा झाले नाहीत. आता काही केले तरी राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकत नाही. ज्या राज्यातून काँग्रेसचे अध्यक्ष निवडून येतात. त्याच राज्यात त्यांना सोबत घेण्याची गरज वाटत नाही''. 

दरम्यान, उत्तर प्रदेश राज्यात बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पक्ष एकत्र आले आहेत. मात्र, या दोन्ही पक्षांनी काँग्रेसला सामावून घेतले नाही. त्याच पार्श्वभूमीवर नीलेश राणे यांनी ट्विट केले. 

Web Title: Rahul Gandhi can not be Prime Minister says Nilesh Rane