शपथविधीनंतर उद्धव ठाकरे यांना राहुल गांधींनी दिल्या शुभेच्छा!

टीम ई-सकाळ
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

- महाविकासआघाडीकडून जनतेला अपेक्षा.

- हे स्थिर, धर्मनिरपेक्ष आणि गरिबांच्या हिताचे सरकार.

नवी दिल्ली : राज्यात महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाले. उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. त्यानंतर काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या. 

राहुल गांधी यांनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहून शुभेच्छा दिल्या. यामध्ये शपथविधी सोहळ्यासाठी आमंत्रित केल्याबद्दल धन्यवाद, असे सांगितले. तसेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याने मी तुमचे अभिनंदन करतो. आपल्या शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित राहू न शकल्याने कृतज्ञता व्यक्त करतो. याशिवाय भाजपकडून लोकशाहीला कमकुवत बनविण्याचे काम राज्यात केले जात होते. मात्र, राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीने एकत्र येऊन भाजपचा पराभव केला. त्यामुळे मला अत्यंत आनंद होत आहे.

Image may contain: text

महाराष्ट्रातील जनतेला सत्तेत आलेल्या महाविकासआघाडीकडून मोठ्या अपेक्षा आहेत. मला विश्वास आहे, की ते स्थिर, धर्मनिरपेक्ष आणि गरिबांच्या हिताचे सरकार देईल. या नव्या प्रवासासाठी तुम्हाला शुभेच्छा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rahul Gandhi Congratulated to Uddhav Thackeray after Oath Ceremony