राहुल गांधी लढणार महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघातून निवडणूक?

वृत्तसंस्था
सोमवार, 21 जानेवारी 2019

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यावेळी महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. रायबरेली आणि अमेठी हे मतदारसंघ नेहमीच काँग्रेसचे गड मानले गेले आहेत. आता तिसरा पर्याय म्हणून महाराष्ट्रातील नांदेड मतदारसंघाचे नाव घेतले जात आहे. त्यामुळे राहुल गांधी नांदेड मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची शक्यता एका वृत्तवाहिनीने दिली आहे.

नवी दिल्ली- काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यावेळी महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. रायबरेली आणि अमेठी हे मतदारसंघ नेहमीच काँग्रेसचे गड मानले गेले आहेत. आता तिसरा पर्याय म्हणून महाराष्ट्रातील नांदेड मतदारसंघाचे नाव घेतले जात आहे. त्यामुळे राहुल गांधी नांदेड मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची शक्यता एका वृत्तवाहिनीने दिली आहे.

आगामी लोकसभा निवडणूक सोनिया गांधी कदाचित लढवणार नाहीत, असे सांगितले जात आहे. त्यामुळे सोनिया गांधी यांच्या रायबरेली मतदारसंघातून राहुल गांधी निवडणूक लढवितील असेही संकेत मिळत आहेत. आता महाराष्ट्रातील नांदेड लोकसभा मतदार संघातून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे खासदार आहेत. 

दरम्यान, राहुल गांधी यांनी 2014 ची लोकसभा निवडणूक अमेठी या मतदार संघातून लढविली होती. भाजपच्या स्मृती इराणी यांनी त्यांना चांगलीच टक्कर दिली होती. राहुल गांधी देशाच्या कोणत्याही मतदार संघातून निवडणूक लढवू शकतात, असे अशोक चव्हाण यांनीही सांगितलेले आहे.
 

Web Title: Rahul Gandhi to contest Lok Sabha elections from Maharashtra