राहुल गांधी काँग्रेस अध्यक्षपदी कायम : सुरजेवाला

राहुल गांधी काँग्रेस अध्यक्षपदी कायम : सुरजेवाला

नवी दिल्ली : काँग्रेसने राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. त्यामुळे राहुल गांधी हेच काँग्रेसचे अध्यक्ष होते, आहेत आणि राहणार, असे काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी आज (बुधवार) स्पष्ट केले. 

नवी दिल्ली येथे काँग्रेसच्या कोअर ग्रुपची बैठक पार पडली. या बैठकीनंतर सुरजेवाला यांनी याबाबतचे स्पष्टीकरण दिले. लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांकडून त्यांची मनधरणी केली जात होती. राहुल गांधी यांच्या या निर्णयानंतर पक्षामध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. 

दरम्यान, सुरजेवाला यांनी दिलेल्या या स्पष्टीकरणानंतर राहुल गांधी अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com