यांच्या फक्त बेटी बचाओच्या घोषणाच : राहूल गांधी 

वृत्तसंस्था
सोमवार, 30 जुलै 2018

बिहारमधील मुजफ्फरनगरमधील बालसुधारगृहातील मुलींचे लैंगिक शोषण झाल्याच्या मुद्यावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर टीका केली आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करुन म्हटले आहे की, ही आश्वासन बाबू आणि सुशासन बाबूची गोष्ट आहे, आम्ही एकले आहे की, आपण ज्यांना निवडले आहे त्यांनी फक्त 'बेटी बचाओ'च्या घोषणाच दिल्या आहेत.

मुजफ्फरनगर - बिहारमधील मुजफ्फरनगरमधील बालसुधारगृहातील मुलींचे लैंगिक शोषण झाल्याच्या मुद्यावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर टीका केली आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करुन म्हटले आहे की, ही आश्वासन बाबू आणि सुशासन बाबूची गोष्ट आहे, आम्ही एकले आहे की, आपण ज्यांना निवडले आहे त्यांनी फक्त 'बेटी बचाओ'च्या घोषणाच दिल्या आहेत.

दरम्यान, मुजफ्फरनगरमधील एका बालसुधारगृहातील 42 पैकी 34 मुलींचे लैंगिक शोषण झाल्याचे समोर आले आहे. हे प्रकरण टाटा इन्सिट्यूट ऑफ सोशल सायन्स (टीआईएसएस) चा अहवाल समोर आल्यानंतर उजेडात आले आहे. 31 मे रोजी बिहार सरकारला सादर केलेल्या अहवालात लहान मुलींचे शोषण केले जात असल्याचे स्पष्ट म्हटले आहे. 

या संदर्भात, विरोधी पक्षाने सातत्याने सीबीआय चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर राज्य सरकारने सीबीआय चौकशीसाठी शिफारस केली आहे.

Web Title: rahul gandhi criticise on narendra modi and nitish kumar