'पूरे विश्व में शोर है, हिंदूस्तान का चौकीदार चोर है'

'पूरे विश्व में शोर है, हिंदूस्तान का चौकीदार चोर है'

नवी दिल्ली- केवळ देशातच नाही तर पूर्ण जगात आता भारताचे पंतप्रधान चोर आहेत, अशी वल्गना होऊ लागल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. आपल्या देशाच्या चौकीदारांनी चोरी केली आणि फ्रान्सच्या सरकारला संकटात टाकले आहे. राफेल करारावरून आता फ्रान्सची जनताच चौकशीची मागणी करत असल्याचे राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून म्हटले आहे. अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे.

फ्रान्समधील 'शेर्पा असोसिएशन' या नावाने फ्रान्समधील 'आर्थिक घोटाळे' उघडकीस आणणाऱ्या संस्थेने फ्रेंच नागरिकांच्या वतीने फ्रान्सच्या नॅशनल प्रोसिक्युटर ऑफिसला तक्रार दाखल केली होती. या संस्थेने भारत आणि फ्रान्स सरकारमध्ये सप्टेंबर 2016 मध्ये झालेल्या 59 हजार कोटीच्या राफेल कराराची चौकशी करण्याची मागणी केलेली आहे. या गोष्टीला अनुसरुनच राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली आहे.


बेकायदा आर्थिक स्त्रोत, भ्रष्टाचार, कर चुकवेगिरी एकूणच आर्थिक गुन्ह्यांविरोधात आपण लढा देतो असा या संस्थेचा दावा आहे. फ्रान्सच्या 'मीडियापार्ट' संकेतस्थळाने ही माहिती दिली असून ऑक्टोबर अखेरीस या संस्थेकडून ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.

दरम्यान, राफेल विमान करारावरून काँग्रेसकडून मोदी सरकारवर सातत्याने टीका केली जात असताना, राफेल कराराबाबत फ्रान्सच्या जनेतेचीच तक्रार असल्याचे समजत आहे. यावरूनच राहुल गांधीनी मोदींवर ट्विटरवरून निशाणा साधला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com