मोदी नेमके कोणत्या प्रकारचे हिंदू? : राहुल गांधी

वृत्तसंस्था
शनिवार, 1 डिसेंबर 2018

उदयपूर : राजस्थानातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. 'मोदी नेमके कोणत्या प्रकारचे हिंदू आहेत?' असा सवाल त्यांनी यावेळी केला. मोदी हे हिंदू असले तरी, त्यांना हिंदुत्वाबद्दल काहीच माहिती नाही, तसेत गीतेत काय सांगितले आहे हे ही त्यांना माहीत नाही.

राहुल गांधी सध्या राजस्थान दौऱ्यावर आहेत. उदयपूर येथील व्यापाऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले. सर्जिकल स्ट्राईक हा सैन्याने केला होता, त्याचे श्रेयही मोदींनी घेतले. तसेच मनमोहन सिंग यांच्या काळात तीन वेळा सर्जिकल स्ट्राईक झाले होते, पण त्यांनी लष्करी अधिकाऱ्यांना याबाबतची गोपनियता ठेवण्याबाबत विनंती केली होती. मोदींनी अशी कोणतीही गोपनियता न ठेवता सैन्याच्या निर्णयात हस्तक्षेप केला व या सर्जिकल स्ट्राईकचा राजकीय फायदा कसा होईल हे बघितले, असेही त्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदीचा निर्णय घेतला, तोही सर्व मंत्रिमंडळाला एका खोलीत बंद करून घेतला. यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेचे खूप नुकसान झाले आहे, असे मत गांधी यांनी व्यापाऱ्यांशी बोलताना व्यक्त केले.

Web Title: Rahul Gandhi Criticized Narendra Modi at Rajasthan on Hinduism