भाजपकडून देशाची चेष्टा : राहुल गांधी

वृत्तसंस्था
गुरुवार, 17 मे 2018

देशातील सर्व यंत्रणांना घाबरवले जात आहे. न्यायाधीशही भीतीच्या छायेखाली आहेत. काही लोक या भीतीचा फायदा उठवत आहेत. तसेच कर्नाटकात देशाच्या संविधानावर घाला घालण्यात आला आहे.

नवी दिल्ली : भाजपकडून कर्नाटकमध्ये सरकार स्थापनेसाठी तथ्यहीन आग्रह करण्यात येत आहे. भाजपकडे बहुमतासाठी लागणारे पुरेसे संख्याबळ नाही. तरीदेखील सरकार स्थापनेसाठी प्रयत्न केले जात आहेत. असा प्रकार आपल्या देशाची चेष्टा करणारा आहे, असे टीकास्त्र काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोडले.

देशातील सर्व यंत्रणांना घाबरवले जात आहे. न्यायाधीशही भीतीच्या छायेखाली आहेत. काही लोक या भीतीचा फायदा उठवत आहेत. तसेच कर्नाटकात देशाच्या संविधानावर घाला घालण्यात आला आहे. त्यामुळे आता आपल्या सर्वांना एकत्र येऊन याला विरोध करायला हवा, असे राहुल गांधींनी सांगितले. 

छत्तीसगड येथे जनस्वराज संमेलनात उपस्थितांना संबोधित करताना राहुल गांधी बोलत होते. देशातील कोट्यवधी शेतकरी कर्जमाफी मागत आहेत. मात्र, अर्थमंत्री अरूण जेटली सांगतात, की आमच्याकडे याबाबत कोणतेही धोरण नाही. एका बाजूला हत्याप्रकरणातील आरोपी देशाच्या राष्ट्रीय पक्षाचा प्रमुख आहे. तर दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाचे चार न्यायाधीश सांगतात, की आम्ही काम करू शकत नाही. इतकेच नाहीतर माध्यमंही भीतीमुळे काम करत नाही.

तसेच ते पुढे म्हणाले, सामान्य जनता न्यायासाठी सर्वोच्च न्यायालयात जाते. 70 वर्षांनंतर सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश जनतेसमोर येऊन आवाज दाबला जात आहे. आम्ही आमचे काम करू शकत नाही. देश आज पराभवाचा शोक व्यक्त करत आहे. भाजपकडून कर्नाटकमध्ये सरकार स्थापनेसाठी तथ्यहीन आग्रह करण्यात येत आहे. भाजपकडे बहुमतासाठी लागणारे पुरेसे संख्याबळ नाही. तरीदेखील सरकार स्थापनेसाठी प्रयत्न केले जात आहेत. असा प्रकार आपल्या देशाची चेष्टा करणारा आहे.

Web Title: Rahul Gandhi Criticizes BJP