पंतप्रधान मोदी गरिबांना सवलत देत नाहीत : राहुल गांधी

यूएनआय
शनिवार, 1 एप्रिल 2017

देशातील श्रीमंतांना पंतप्रधान मोदी सवलत देत आहेत, मग शेतकऱ्यांना का सवलत नाही?

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील श्रीमंतांना सवलत देतात मात्र गरिबांना देत नाहीत, असा आरोप कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज केला.

दुष्काळाने होरपळणाऱ्या तमिळनाडूच्या शेतकऱ्यांना मदत मिळावी, या मागणीसाठी शेतकरी जंतरमंतरवर आंदोलन करीत होते, त्या वेळी राहुल गांधी यांनी त्यांची भेट घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, देशातील श्रीमंतांना पंतप्रधान मोदी सवलत देत आहेत, मग शेतकऱ्यांना का सवलत नाही, असा प्रश्‍नही त्यांनी केला. वास्तविक शेतकरी देश उभा करतात. केंद्र सरकार आणि पंतप्रधानही या शेतकऱ्यांचा आवाज ऐकत नाहीत. शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेण्याचे पंतप्रधानांचे कर्तव्य आहे. तमिळनाडूच्या शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकले पाहिजे, असे राहुल गांधी म्हणाले. दुष्काळाने होरपळणाऱ्या तमिळनाडूतील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून ते जंतरमंतरवर आंदोलन करीत आहेत.

. . . . . .

Web Title: Rahul Gandhi criticizes Modi