...तर हे कसले पंतप्रधान: राहुल गांधी

वृत्तसंस्था
सोमवार, 26 सप्टेंबर 2016

लखनौ - बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती व समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यांचा "रिमोट‘ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातीच असल्याची टीका कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (सोमवार) केली. "मायावती व मुलायम यांच्याविरोधात गैरव्यवहाराचे आरोप आहेत. ते संसदेमध्ये काही बोलण्यासाठी उभे राहिले; की मोदीजी त्यांच्याकडे पाहतात व ते खाली बसतात! कारण या दोन्ही नेत्यांना केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) भय आहे,‘‘ असे गांधी म्हणाले. गांधी यांनी यावेळी शेतकऱ्यांच्या मुद्यावरुनही पंतप्रधानांना लक्ष्य केले. 
 
""आज मी इंटरनेटच्या माध्यमामधून शेतकऱ्यांशी संवाद साधेन, असे मोदीजींनी सांगितले आहे. शेतकरी व पंतप्रधानांमध्ये 2 हजार किमींचे अंतर असेल. आम्ही शेतकऱ्यांचे कर्ज माफ केल्याचे अभिमानाने सांगतो. तर मोदीजी उद्योगपतींचे कर्ज माफ केल्याची कबुली हळुच देतात. पंतप्रधान जर देशामधील नागरिकांना भेटण्यास तयार नसतील; त्याच्या घामास स्पर्श करण्यास तयार नसतील; तर हे कसले पंतप्रधान?,‘‘ असे गांधी म्हणाले. 
 
कॉंग्रेसच्या वतीने आयोजित केलेल्या किसान यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यास आज (सोमवार) प्रारंभ झाला. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर गांधी यांनी पुन्हा एकदा या यात्रेस सुरुवात केली. यात्रेचा पहिला टप्पा नुकताच संपला असून, त्यामध्ये गांधी यांनी 17 खाट सभा व 12 रोड शो घेत जनतेच्या व्यथा समजून घेतल्या.

Web Title: Rahul Gandhi criticizes PM Narendra Modi