"एवढं खोटं टेलिप्रॉम्पटरलाही झेपलं नाही"

काँग्रेस नेते राहुल गांधींनी हे ट्विट केलं आहे.
Pm Narendra Modi
Pm Narendra ModiTeam eSakal

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय. पंतप्रधान मोदींनी सोमवारी रात्री जागतिक आर्थिक परिषदेच्या (World Economic Forum) अजेंडा बैठकीला संबोधित केलं. यावेळी पंतप्रधान मोदी बोलताना अचानक अडखळले आणि थांबले. त्यानंतर विरोधकांनी त्यांचं टेलिप्रॉम्पटर (Teleprompter) बंद झालं असल्याची टीका केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधींनीही खरमरीत टीका केली आहे.

Pm Narendra Modi
PM मोदींमुळे चर्चेत आलेलं 'टेलिप्रॉम्पटर' म्हणजे नेमकं असतं तरी काय?

पंतप्रधान मोदींचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. विरोधकांनी त्यांचे व्हिडीओ शेअर करत चांगलीच टीका केली आहे. त्यानंतर आता राहुल गांधींनीही या प्रकरणात नाव न घेता मोदींवर टीका केली आहे. राहुल गांधी यांनी या ट्विटमध्ये म्हटलं की, करताना म्हटलं की, टेलिप्रॉम्पटरलाही एवढं खोटं झेपलं नाही.

दरम्यान, दावोसमध्ये झालेल्या भाषणावेळी टेलिप्रॉम्पटरमध्ये तांत्रिक अडचणीमुळे व्यत्यय आल्याचं म्हटलं जात आहे. तेव्हा मोदींना भाषण अचानक थांबवावं लागलं आणि त्यांचा काही क्षण गोंधळही उडाला. तेव्हा मोदींनी आलेला रागही आवरल्याचं दिसतं. आपल्या डाव्या बाजुला बघून त्यांनी दोन्ही हातही वर केले होते. त्यानंतर कानात हेडफोन घालून समोर असलेल्यांना ऐकू येतंय ना असा प्रश्न विचारला. यावेळेत टेलिप्रॉम्पटर पुन्हा सुरु झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा त्यांचं भाषण पहिल्यापासून सुरु केलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com