Rahul Gandhi disqualified: "आमच्या रक्ताची एक खासियतए..."; प्रियांका गांधींचं भावनिक ट्विट

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर त्यांच्या भगिनी प्रियांका गांधी यांनी एकामागून एक भावनिक ट्विट केले आहेत.
Modi_Priyanka Gandhi
Modi_Priyanka Gandhi

नवी दिल्ली : Rahul Gandhi disqualified : राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर त्यांच्या भगिनी आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी एकामागून एक असे चार भावनिक ट्विट केले आहेत. यामध्ये त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच गांधी कुटुंबियांच्या धमन्यांमध्ये जे रक्त वाहत आहे त्याची एक खासियत आहे, अशा शब्दांत त्यांनी सरकारवर टीका केली.

प्रियांका गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना उद्देशून म्हटलं की, "तुमच्या चमच्यांनी एका शहीद पंतप्रधानाच्या मुलाला देशद्रोही मीर जाफर म्हटलं. आपल्याच एका मुख्यमंत्र्यानं राहुल गांधींचे वडील कोण? अशा प्रश्न उपस्थित केला. काश्मिरी पंडितांच्या परंपरेचं पालन करत एक मुलगा मृत्यूनंतर पगडी घालत, आपली परंपरा कायम ठेवतो. पण भर संसदेत तुम्ही संपूर्ण कुटुंब तसेच काश्मीरी पंडीत समाजाचा अपमान करत विचारलं की, ते नेहरु नाव का लिहीत नाही. पण तुम्हाला कुठल्याही न्यायाधीशानं दोन वर्षांची शिक्षा सुनावली नाही. तुम्हाला संसदेतून बाद केलं नाही"

"राहुल गांधींनी एका खऱ्या देशभक्ताप्रमाणं अदानीच्या लुटीवर प्रश्न उपस्थित केला. नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीवर प्रश्न विचारले. तुमचा मित्र गौतम अदानी देशाची संसद आणि भारताच्या जनतेपेक्षा मोठा झाला आहे का? की त्यांच्या लुटीवर प्रश्न विचारले तर तुम्ही चवताळून उठलात"

हे ही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

"तुम्ही माझ्या कुटुंबाला घराणेशाही म्हणता, तर तुम्ह एक लक्षात ठेवा याच कुटुंबानं भारताच्या लोकशाहीला आपलं रक्त आटवून जिवंत ठेवलं आहे जी लोकशाही तुम्ही संपवायचा प्रयत्न करत आहात. याच कुटुंबानं भारताचा आवाज वाढवला आहे तसेच आमच्या पूर्वजांनी सत्याची लढाई लढली आहे. आमच्या धमन्यांमध्ये जे रक्त खेळतंय त्याची एक खासियत आहे. तुमच्यासारख्या भित्र्या, सत्तालोभी आणि हुकूमशाहसमोर कधीच झुकलो नाही आणि झुकणार नाही. तुम्ही काहीही करा," अशा शब्दांत प्रियांका गांधींनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com