वडिलांच्या 32 व्या पुण्यतिथीनिमित्त राहुल गांधींच भावनिक ट्विट, म्हणाले, ''तुम्ही नेहमी...''

राहुल गांधींनी ट्विटरवर व्हिडिओ शेअर करत भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
 Rajiv Gandhi death anniversary
Rajiv Gandhi death anniversarySakal

Rajiv Gandhi Death Anniversary: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या 32 व्या पुण्यतिथीनिमित्त काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी त्यांच्या दिवंगत वडिलांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करत राहुल गांधींनी लिहिले की, ''पापा तुम्ही नेहमी माझ्यासोबत आहात.'' काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, प्रियंका गांधी आणि पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहिली.

राजीव गांधींच्या विविध फोटोंचा व्हिडीओ शेअर करत राहुल गांधी यांनी ट्विट केले की, "पापा, तुम्ही सदैव माझ्यासोबत, आठवणींमध्ये आहात प्रेरणा म्हणून."

राहुल गांधी आणि त्यांची बहीण प्रियंका गांधी वड्रा, आई सोनिया गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना त्यांच्या 32 व्या पुण्यतिथीनिमित्त दिल्लीतील वीरभूमी येथे पुष्पांजली वाहिली.

भारताचे सर्वात तरुण पंतप्रधान:

राजीव गांधी यांनी 1984 मध्ये त्यांची आई आणि तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर काँग्रेसची कमान हाती घेतली होती. ऑक्टोबर 1984 मध्ये त्यांनी पदभार स्वीकारला तेव्हा वयाच्या 40 व्या वर्षी ते भारताचे सर्वात तरुण पंतप्रधान बनले.

त्यांनी 2 डिसेंबर 1989 पर्यंत भारताचे पंतप्रधान म्हणून काम केले. राजीव गांधी यांची 21 मे 1991 रोजी लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम (LTTE) च्या आत्मघातकी बॉम्बरने श्रीपेरुंबदुर, तामिळनाडू येथे निवडणूक रॅलीदरम्यान हत्या केली.

 Rajiv Gandhi death anniversary
Arvind Kejriwal: केजरीवालांनी PM मोदींच्या 'त्या' 10 वर्ष जुन्या ट्विटची आठवण करून देत विचारले...

राहुल गांधी श्रीपेरंबुदूरला जाणार:

वडिलांना श्रद्धांजली वाहण्यासाठी राहुल गांधी आज श्रीपेरंबदुर येथे जाणार आहेत. दरम्यान, त्याने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी वडील राजीव गांधी यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

या व्हिडिओमध्ये राजीव गांधींचे देशाच्या विकासातील योगदान मांडण्यात आले आहे. या व्हिडिओमध्ये त्यांच्या शपथविधी सोहळ्याच्या फोटोंमधून पंतप्रधान असताना देशाची झलक दाखवण्यात आली आहे.

 Rajiv Gandhi death anniversary
Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com