Loksabha 2019 : राहुल गांधींचा अमेठीतून अर्ज दाखल; जोरदार शक्तीप्रदर्शन

Rahul Gandhi, Priyanka Gandhi
Rahul Gandhi, Priyanka Gandhi

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (बुधवार) अमेठीतून उमेदवारी अर्ज दाखल केला. यापूर्वी त्यांनी काढलेल्या रोड शो मधून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले.

राहुल गांधी आज अमेठीतून अर्ज दाखल करणार होते. आज अर्ज दाखल करताना त्यांच्यासोबत आई सोनियां गांधी, बहिण प्रियांका गांधी आणि तिचे पती रॉबर्ट वद्रा उपस्थित होते. 'यूपीए' अध्यक्षा सोनिया गांधी या 11 तारखेला म्हणजे उद्या रायबरेली मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.  

या दोन्ही दिवशी उत्तर प्रदेशमधील काँग्रेसच्या या दोन अखेरच्या बालेकिल्ल्यांमध्ये गांधी परिवार उपस्थित असेल. या दोन्ही दिवशी काँग्रेसकडून मोठ्या प्रमाणावर शक्तिप्रदर्शन करण्यात येईल. आज अमेठीमध्ये हेच पाहायला मिळाले. आज झालेल्या रोड शो ला नागरिकांचा जबरदस्त प्रतिसाद होता. यामध्ये नागरिकांकडून चौकीदार चोर है चा नारा देण्यात आला. अमेठी आणि रायबरेलीमध्ये निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात सहा मे रोजी मतदान होणार आहे. अमेठीत राहुल गांधी यांची लढत स्मृती इराणी यांच्याविरुद्ध होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com