'पाखंडी नेत्यालाच आजी आठवते'; राहुल गांधींच्या दौऱ्यावर नकवींचा टोमणा

mukhtar nakvi
mukhtar nakvi

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी काँग्रेस पक्ष स्थापना दिनाच्या आदल्या दिवशीच विदेश दौऱ्यावर गेले आहेत. यावरुन विरोधकांनी राहुल गांधींना धारेवर धरत म्हटलंय की ते राजकारण गांभीर्याने करत नाहीत. यावर काँग्रेसचे महासचिव केसी वेणुगोपाल यांनी स्पष्टीकरण देत म्हटलंय की राहुल गांधी हे आपल्या आज्जीला भेटायला गेले आहेत. 

मात्र, दुसरीकडे भाजप नेत्यांकडून सातत्याने राहुल गांधींवर निशाणा साधला जात आहे. केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी त्यांच्यावर टोमणा मारत म्हटलंय की, प्रियंका गांधी आपल्या आजीवर जितकं प्रेम करत नाहीत तितकं राहुल गांधी करतात. तर दुसऱ्या बाजूला केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी राहुल गांधींवर हल्ला करत म्हटलं की, पार्ट टाइम पॉलिटिक्स, फुल टाइम पर्यटन आणि पाखंड जो नेता करेल त्याला त्याच्या आजीची आठवण येणार. 

केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे नेते गिरिराज सिंह यांनी ट्विट करुन म्हटलंय की, प्रियंका गांधीजी आपल्या आजीवर जेवढं प्रेम करत नाहीत, जेवढं राहुल गांधी करतात. सोमवारी देखील गिरिराज सिंह यांनी राहुल गांधींवर निशाणा साधत म्हटलं होतं की, भारतात राहुल गांधींची सुट्टी संपली आहे आणि आता ते इटलीला परत गेले आहेत. 

पाखंड करणाऱ्या नेत्याला आजी आठवते
तर केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे नेते मुख्तार अब्बास नकवी यांनी म्हटलंय की, पार्ट टाइम पॉलिटिक्स, फुल टाइम पर्यटन आणि पाखंड जो नेते करेल त्याला त्याची आजी आठवेल आणि जेंव्हा आजीची आठवण येते तेंव्हा ते कुठे जातात हे फक्त त्यांनाच माहिती असतं.

काँग्रेस नेत्यांनी काय म्हटलंय?
काँग्रेसचे प्रवक्ता रणदीप सिंह सुरजेवाला यांनी राहुल गांधींच्या परदेश दौऱ्याची माहिती देत म्हटलंय की, आम्ही आधीदेखील सांगितलं  होतं की राहुल गांधी एका छोट्या वैयक्तिक दौऱ्यावर आहेत आणि ते लवकरच परततील. तर काँग्रेसचे महासचिव केसी वेणुगोपाल यांनी म्हटलंय की, राहुल गांधी आपल्या आजीला भेटायला गेले आहेत. हे चुकीचं आहे का? वैयक्तिक दौरा करायचा अधिकार प्रत्येकाला आहे. भाजप खालच्या दर्जाचे राजकारण करत आहे. ते राहुल गांधींवर निशाणा साधात आहेत कारण ते केवळ एका नेत्यावर निशाणा साधू इच्छित आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com