राहुल गांधींनी एअर अॅम्ब्युलन्सला करून दिली वाट

वृत्तसंस्था
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

राहुल गांधी त्यांच्या खासगी चॉपर चेंगनूर हेलिपॅडहून उड्डाण भरणार होते. त्यावेळी एक एअर अॅम्ब्युलन्सही केरळकडे जाण्यासाठी रवाना होणार होती. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर राहुल गांधी यांनी स्वतः काही काळ प्रतीक्षा करत एअर अॅम्ब्युलन्ससाठी मार्ग मोकळा करुन दिला.

तिरुअनंतपुरम : केरळमध्ये पडणाऱ्या मुसळधार पाऊस आणि त्यानंतर आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पुरग्रस्तांची भेट घेण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी केरळमध्ये दाखल झाले आहेत. तत्पूर्वी राहुल गांधींनी केरळकडे जाणाऱ्या एअर अॅम्ब्युलन्सला स्वत: प्रतीक्षा करत मार्ग करुन दिला.

केरळमधील पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रातील काही मंत्र्यांनी केरळचा दौरा केला होता. त्यानंतर आता राहुल गांधी यांनीही केरळचा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान राहुल गांधी यांनी स्वत: केरळकडे जाणाऱ्या एअर अॅम्ब्युलन्सला मार्ग मोकळा करुन दिला. ही एअर अॅम्ब्युलन्स वैद्यकीय मदत पुरवण्यासाठी जात होती. याची माहिती मिळाल्यानंतर राहुल यांनी स्वत: काही काळ प्रतीक्षा करत एअर अॅम्ब्युलन्सला जाण्यासाठी मार्ग दिला. 

दरम्यान, राहुल गांधी त्यांच्या खासगी चॉपर चेंगनूर हेलिपॅडहून उड्डाण भरणार होते. त्यावेळी एक एअर अॅम्ब्युलन्सही केरळकडे जाण्यासाठी रवाना होणार होती. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर राहुल गांधी यांनी स्वतः काही काळ प्रतीक्षा करत एअर अॅम्ब्युलन्ससाठी मार्ग मोकळा करुन दिला.

Web Title: Rahul Gandhi gave the way to air ambulance