जेटलीजी आपकी दवा मे दम नही: राहूल गांधी

वृत्तसंस्था
गुरुवार, 26 ऑक्टोबर 2017

राहुल गांधी यांनी आज (गुरुवार) सकाळी ट्विट करत जीएसटी आणि नोटाबंदीच्या निर्णयावरून जेटलींनी केलेल्या वक्तव्यावर टीका केली. सलग तीन वर्षे भारताची अर्थव्यवस्था जगातील सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था ठरली आहे, असे जेटलींनी म्हटले होते. त्यावर उत्तर देताना राहुल गांधी यांनी हे ट्विट केले आहे. 

नवी दिल्ली - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना लक्ष्य करत नोटाबंदी आणि जीएसटीमुळे अर्थव्यवस्था आयसीयूमध्ये असल्याचे म्हटले आहे. तसेच तुम्ही म्हणत आहात आम्ही कोणापेक्षा कमी नाही, पण तुमच्या औषधातही दम नाही, असा टोलाही राहुल यांनी मारला आहे.

राहुल गांधी यांनी आज (गुरुवार) सकाळी ट्विट करत जीएसटी आणि नोटाबंदीच्या निर्णयावरून जेटलींनी केलेल्या वक्तव्यावर टीका केली. सलग तीन वर्षे भारताची अर्थव्यवस्था जगातील सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था ठरली आहे, असे जेटलींनी म्हटले होते. त्यावर उत्तर देताना राहुल गांधी यांनी हे ट्विट केले आहे. 

सोमवारी गुजरातमधील सभेत राहुल गांधी यांनी ‘जीएसटी’ म्हणजे, ‘गब्बर सिंग टॅक्स’ असे म्हणून टीका केली होती. तसेच त्यांनी जीएसटी म्हणजे ये कमाई मुझे दे दे असेही म्हटले होते. 

Web Title: rahul gandhi on gst dr arun jaitley economy is in icu your medicines are not working