आचारसंहिता भंग: राहुल गांधी, हरिश रावतांवर गुन्हे दाखल

वृत्तसंस्था
मंगळवार, 14 फेब्रुवारी 2017

हरिद्वार (उत्तराखंड) - उत्तराखंड विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी एक दिवस बाकी असताना काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी, उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरिश रावत यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

हरिद्वारचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कृष्णा यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, "रोड शो घेतल्याने आणि रात्री 10 नंतर लाऊडस्पीकरचा वापर केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.' राहुल यांनी 75 किलोमीटर अंतर पार करणारा रोड शो घेतला होता. या रोड शो मध्ये मोठ्या प्रमाणात दुचाकी धारक आणि ढोल वाद सहभागी होते. या रोड शो दरम्यान कोपरा सभाही घेण्यात आल्या होत्या. निवडणूक प्रचाराची वेळ संपत आलेली असताना रात्री उशिरा राहुल गांधी आणि रावत यांनी गंगा आरतीमध्ये सहभाग घेतला होता. त्यामुळे या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. उत्तराखंडमधील 70 विधानसभा जागांसाठी 15 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे.

Web Title: Rahul Gandhi, Harish Rawat booked for violating Model code of conduct