मोदी अन् राहुल गांधींच्या 'त्या' क्षणांचे व्हिडिओ व्हायरल

Rahul Gandhi and Narendra Modis Viral Video
Rahul Gandhi and Narendra Modis Viral Video

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी व काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या दौऱयादरम्यान घडलेल्या प्रसंगाचे व्हिडिओ आज (शुक्रवार) सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.

राहुल गांधी आज ओडिशाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या दौऱ्याला सुरुवात होण्यापुर् विमानतळावर एक प्रसंग घडला. राहुल गांधी भुवनेश्वर विमानतळावर असताना एक फोटोग्राफर तीन-साडेतीन फुटांवरुन खाली पडला. त्यावेळी राहुल गांधी क्षणाचाही विलंब न करता मागे धावत आले अन् विचारपूस केली. पुढे ते त्यांच्या नियोजित कार्यक्रमांसाठी रवाना झाले. या घटनेचा व्हिडिओ व छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही एक व्हिडीओ सोशल मीडियावरून व्हायरल होते आहे. मोदी भाषण करत असताना त्यांच्या शेजारी असलेला एक पोलिस अधिकारी चक्कर येऊन खाली पडतो. या दरम्यान मोदी मागे वळून पाहतात तरीही भाषण सुरूच ठेवतात. पण, या पोलिस अधिकाऱ्याच्या मदतीसाठी इतर धावतात, असे दृश्य या व्हिडीओत आहे.

दरम्यान, राहुल गांधी यांचा व्हिडिओ आजचा आहे तर मोदींशी संबंधित व्हिडिओ 15 ऑगस्ट 2013चा आहे. त्यावेळी नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. मोदी स्वातंत्र्यदिनानिमित्त भाषण करताना पोलीस महासंचालक अमिताभ पाठक चक्कर येऊन पडले. त्यावेळी मोदी त्यांच्यापासून अगदी काही फूट अंतरावर होते. मोदींचे भाषण सुरू होऊन अर्धा तास झाला, त्यावेळी पाठक कोसळले. त्यावेळी मोदींनी बाजूला पाहिले. यानंतर व्यासपीठावरील इतर पोलिस अधिकारी पाठक यांच्या मदतीला धावले. त्यांनी पाठक यांना व्यासपीठावर खाली नेले. यावेळीही मोदींनी मागे वळून पाहिले. मात्र त्यांनी भाषण सुरुच ठेवले होते.

राहुल गांधी व नरेंद्र मोदी यांच्याशी संबंधित व्हिडिओवर नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com