राहुल गांधी जेव्हा पायलटच्या मदतीला उतरतात अन् पाहा व्हिडिओ

Rahul Gandhi
Rahul Gandhi

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, या व्हिडिओमध्ये राहुल गांधी हेलिकॉप्टर दुरुस्त करणाऱ्या पायलटला मदत करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ स्वतः राहुल गांधी यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. फोटोला त्यांनी छान टीमवर्क असे कॅप्शन दिले आहे. 

राहुल गांधी हे लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्यातील शेवटच्या दिवशी प्रचारासाठी हिमाचल प्रदेशातील उना याठिकाणी गेले होते. उना येथील सलोह मैदानावर थांबलेल्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाडी झाली होती. त्याची दुरुस्ती पायलट करत होते त्यांना मदत करण्यासाठी राहुल गांधी हेलिकॉप्टरच्या दाराला पकडून पायलटला मदत करताना दिसत आहेत.    

हेलिकॉप्टरच्या दरवाजाची रबर निघाली होती. त्यामुळे दरवाजा बंद होत नव्हता. यावेळी राहुल गांधी यांची टीम तेथे उपस्थित होती. त्यामधील एकाने फेसबुक लाईव्ह केले होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com