पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच पाकिस्तानचे पोस्टरबॉय - राहुल गांधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच पाकिस्तानचे पोस्टरबॉय - राहुल गांधी

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच पाकिस्तानचे पोस्टरबॉय असून मोदींनीच पाकिस्तानमध्ये जाऊन तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांची गळाभेट घेतली होती, अशा शब्दात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपावर पलटवार केला आहे.

राफेल व्यवहाराच्या फाईल्स गहाळ झाल्या म्हणजे त्यामध्ये नक्कीच गैरव्यवहार झाला असल्याचे स्पष्ट मत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन व्यक्त केले आहे. राफेल व्यवहाराची चौकशी करण्याबरोबरच पंतप्रधान मोदींवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.

राफेल प्रकरणाला नवीन वळण मिळाले असून महत्त्वाची कागदपत्रं संरक्षण मंत्रालयातून चोरीला गेल्याची धक्कादायक माहिती काल (ता. 07) सर्वोच्च न्यायालयात महाधिवक्ता के. के. वेणुगोपाल यांनी दिली होती. यावरून विरोधी पक्ष चांगलेच आक्रमक झाले असून अनिल अंबानीच्या फायद्यासाठी नरेंद्र मोदींचा व्यवहारात प्रत्यक्ष सहभाग असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. तसेच, राहुल गांधीनी आज कागदपत्रे चोरी प्रकरणासाठी पत्रकार परिषदेची सुरवातच गायब हो गया है, या वाक्याने केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून पंतप्रधान कार्यालयाचा गैरवापर करण्यात आला असून राफेल डीलप्रकरणी झालेला घोटाळा उघड झाला आहे. त्यामुळे मोदींवर आता फौजदारी खटला दाखल करण्याची वेळ आली असल्याचेही राहुल गांधी यांनी म्हटले. राफेल डीलप्रकरणी विमाने बनवणारी फ्रान्सची कंपनी डसाँ एव्हिएशनला फायदा मिळवून देण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाचा गैरवापर झाला असून याद्वारे सरकारी तिजोरी लुटण्याचा प्रकार घडल्याचा गंभीर आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. यामुळे पंतप्रधानांवर आता फौजदारी खटला दाखल करण्यासाठी पुरेसे पुरावे मिळाले आहेत. त्यामुळे मोदींपासून सुरु झालेल्या या भ्रष्टाचाराच्या खेळाचा शेवट त्यांच्यावरील कारवाईनेच होणार आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com