राहुल गांधींचा इंडिया गेटवर कँडल मार्च

वृत्तसंस्था
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

नवी दिल्ली -  कठुआ आणि उन्नाव बलात्कार प्रकरणाचे देशभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. विविध सामाजिक स्तरातून या घटनेचा निषेध करण्यात येत आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील या घटनांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. या घटनांचा निषेध करण्यासाठी दिल्लीतील इंडिया गेटवर कँडल मार्च काढण्यात आला आहे. यावेळी राहुल गांधी देखील या कँडल मार्चमध्ये सामिल झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात येथे घोषणाबाजी झाली.

दरम्यान, ''लाखो भारतीयांप्रमाणे मलाही अशा घटनांबाबत दुःख झाले असून, भारतात यापुढे महिलांबाबत अशी वागणूक खपवून घेण्यात येणार नाही. हिंसेच्या निषेधार्ह आणि न्यायाच्या मागणीसाठी आज मध्यरात्री माझ्यासोबत इंडिया गेटवर शांतीपूर्ण कँडल मार्चसाठी सहभागी व्हावे'' असे राहुल गांधीनी बोलताना म्हटले होते.

राहुल गांधी यांनी उन्नाव बलात्कार प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला होता. त्यानंतर कठुआमध्ये लहान मुलीसोबत झालेल्या सामुहिक बलात्कार आणि हत्येवरही प्रश्न उपस्थित केले होते. या अमानुष घटनेत कोणी दोषी व्यक्तींना वाचवण्याचा प्रयत्न कसा काय करु शकतो? असा सवालही त्यांनी केला होता. अशा लोकांना शिक्षा दिल्याशिवाय सोडता येणार नाही. या प्रकरणावरुन सुरु असलेल्या राजकारणाचीही राहुल गांधी यांनी निंदा केली होती.

Web Title: Rahul Gandhi Leads Candlelight Vigil In Delhi Demanding Justice In Kathua, Unnao Cases