राहुल गांधी मानसिकदृष्टया अस्थिरः उमा भारती

वृत्तसंस्था
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

भोपाळः काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे मानसिकदृष्ट्या अस्थिर असून, त्यांच्या वक्तव्यामुळे त्यांच्या पक्षातील नेते हैरान झाले आहेत, असे केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी म्हटले आहे.

भोपाळः काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे मानसिकदृष्ट्या अस्थिर असून, त्यांच्या वक्तव्यामुळे त्यांच्या पक्षातील नेते हैरान झाले आहेत, असे केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी म्हटले आहे.

राहुल गांधी यांनी आरएसएसची तुलना मुस्लिम ब्रदरहूडशी करताना 1984 मध्ये झालेल्या शिख दंगलीमध्य काँग्रेस सहभागी नव्हते, असे गांधी यांनी म्हटले आहे. गांधी यांच्यावर टीका करताना उमा भारती म्हणाल्या, 'राहुल गांधी काय बोलतात आणि काय करतात हे सर्वांनीच संसदेत पाहिले आहे. 1984 मध्ये झालेल्या शिख दंगलीमध्ये काँग्रेस सहभागी नव्हते ते वक्तव्य पूर्णपणे चुकीचे आहे. जेवढ्या शिख नागरिकांवर गुन्हे दाखल झाले आहेत, ते सर्व काँग्रेसचे नेते आहेत. यामधूनच गांधी हे मानसिकदृष्या आजारी असल्याचे दिसते. देवाला प्रार्थना करते की त्यांना चांगली सुदबुद्धी दे.'

'मोतीलाल नेहरू, जवाहरलाल नेहरू, इंदिरा गाधी व राजीव गांधी यांनी काँग्रेसची धुरा सांभाळली. परंतु, आज एक कमकुवत व्यक्ती पक्ष चालवत आहे. 1984 मध्ये काय झाले हे राहुल गांधी यांना माहित नाही. त्यामुळे काय बोलावे हे त्यांना कळत नाही,' असेही उमा भारती म्हणाल्या.

Web Title: Rahul Gandhi is mentally unstable says Uma Bharti