होय! राहुल गांधी व चिनी राजदूतामध्ये चर्चा झाली...

वृत्तसंस्था
सोमवार, 10 जुलै 2017

कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी या पार्श्‍वभूमीवर भारताचे चीनशी अद्याप राजनैतिक संबंध असल्याची सारवासारव केली आहे; तर कॉंग्रेस पक्षाच्या सोशल मिडीया विभागाच्या प्रमुख असलेल्या राम्या यांनी या भेटीचे समर्थनच केले आहे

नवी दिल्ली - भूतान-भारत-चीन ट्रायजंक्‍शनजवळ भारतीय लष्कर व चिनी सैन्य एकमेकांसमोर उभे ठाकल्याने निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी चीनच्या राजदूताची भेट घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. मात्र दोन देशांमध्ये सध्या तणावपूर्ण परिस्थिती असताना; चीनकडून सतत भारताला धमक्‍या दिल्या जात असतानाच ही भेट नेमकी का झाली व यात काय चर्चा झाली, या प्रश्‍नांचे उत्तर कॉंग्रेस पक्षाकडून अद्याप देण्यात आलेले नाही. त्याहीआधी कॉंग्रेसकडून या वृत्ताची स्पष्ट शब्दांत "निखालस असत्य' अशी संभावना करण्यात आली होती.

राहुल व चिनी राजदूतामध्ये गेल्या शनिवारी (8 जुलै) भेट झाल्याची माहिती चिनी दूतावासाच्या संकेतस्थळावर देण्यात आली होती. मात्र काही वेळाने ही पोस्ट डिलीट करण्यात आली.

दरम्यान, भारतीय जनता पक्षाकडून (भाजप) या भेटीवर तीव्र टीका करण्यात आली आहे. राहुल गांधी यांच्या कार्यालयाकडून अद्याप या भेटीचे वृत्त नाकारण्यात आलेले नाही; वा त्यास दुजोराही देण्यात आलेला नाही. कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी या पार्श्‍वभूमीवर भारताचे चीनशी अद्याप राजनैतिक संबंध असल्याची सारवासारव केली आहे; तर कॉंग्रेस पक्षाच्या सोशल मिडीया विभागाच्या प्रमुख असलेल्या राम्या यांनी या भेटीचे समर्थनच केले आहे.

"कॉंग्रेस उपाध्यक्ष जर चिनी राजदूतास भेटले असतील; तरी त्यामध्ये काही गैर आहे, असे मला वाटत नाही,'' असे राम्या यांनी म्हटले आहे.

गेल्याच आठवड्यात राहुल यांनी चीनबरोबारील वादासंदर्भात भूमिका जाहीर न केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. या पार्श्‍वभूमीवर राहुल व चिनी राजदूतामध्ये नेमकी काय चर्चा झाली, याविषयी अद्यापी संदिग्धताच आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :
नौगाम सेक्टरमध्ये चकमकीत 2 दहशतवादी ठार
बोट बुडण्यापूर्वी फेसबुकवर केले Live; दोघांचा मृत्यू, 6 बेपत्ता
डेक्कन क्वीनला 1 तास उशीर; प्रवाशांचे आंदोलन
ड्रॅगनची नजर ‘कोंबडीच्या माने’वर​
पुरुषाने दिला मुलीला जन्म​
सिन्नर तालुक्यात शाळकरी मुलीची गळफास घेऊन आत्महत्या​
भूमाफियांमुळे नेवाळी आंदोलनाला हिंसक वळण- आमदार गायकवाड​

मुजोर रिक्षाचालकांविरोधात डोंबिवलीकरांचे 'प्रोटेक्ट अगेन्स्ट रिक्षावाला“
बिल्डर जगदीश वर्मा हत्या प्रकरण; आरोपीची पुराव्याअभावी मुक्तता​
विंडिजकडून भारताचा दारुण पराभव; लुईसचे शतक​

Web Title: Rahul Gandhi Met Chinese Envoy Amid Sikkim Stand-Off