राहुल गांधींनी केली लष्करातील जवानांची श्वानांसोबत तुलना?

पीटीआय
शुक्रवार, 21 जून 2019

- राहुल गांधींनी याबाबतचे केले ट्विट.

- त्यांच्या या नव्या ट्विटवरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता.

नवी दिल्ली : जगभरात अनेक ठिकाणी आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा होत असताना कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मात्र या विषयावर केलेल्या ट्‌विटवरून वाद ओढवून घेतला. भारतीय लष्कराचे जवान त्यांच्या श्‍वानपथकाबरोबर योग करीत असल्याचे छायाचित्र राहुल यांनी ट्‌विट करीत त्याखाली "नवा भारत' असे लिहिले. 

राहुल यांनी केलेल्या या ट्‌विटवरून सत्ताधारी भाजपने त्यांच्यावर जोरदार टीका केली. "राहुल यांच्यासाठी आयुष्य हा एक विनोद आहे. कारण ते स्वत:च्या कुत्र्याचे छायाचित्रही नेहमी पोस्ट करीत असतात. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली न्यू इंडिया उदयास येत असताना, राहुल यांच्या नेतृत्वाखाली "नवी कॉंग्रेस' उदयास येत आहे,' असे भाजपने म्हटले आहे. 

राहुल यांना ट्‌विटरवर अनेकांनी ट्रोल केले. यातून राहुल गांधी आणि कॉंग्रेस पक्षाची यथेच्छ थट्टाही करण्यात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rahul Gandhi mocks International Yoga Day celebrations by Army Dog Unit posts insensitive tweet