राहुल गांधींनी लोकशाहीचा आदर राखावा: भाजप

वृत्तसंस्था
रविवार, 25 डिसेंबर 2016

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धमकी देणे थांबवून काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकशाहीचा आदर राखावा, असे आवाहन भारतीय जनता पक्षाने केले आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धमकी देणे थांबवून काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकशाहीचा आदर राखावा, असे आवाहन भारतीय जनता पक्षाने केले आहे.

वृत्तसंस्थेशी बोलताना भारतीय जनता पक्षाचे नेते श्रीकांत शर्मा म्हणाले, "आठ नोव्हेंबरच्या निर्णयानंतर राहुल गांधींवर सर्वाधिक परिणाम झाला आहे. काँग्रेसचे भ्रष्टाचाराशी फार जवळचे नाते आहे आणि नोटाबंदीच्या निर्णयामुळे त्यांच्या य नात्याला धक्का पोचला आहे. जेथे रोख आहे, तेथे कमिशन असते. जेथे कमिशन असते तेथे काँग्रेस असते. त्यामुळेच राहुल गांधी हे नोटाबंदीच्या निर्णयाला विरोध करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळ्या पैशाविरुद्ध मोहिम उघडली आहे. देशातील नागरिक त्याच्या मागे ठामपणे उभे आहेत. राहुल गांधी मात्र सर्वाधिक नाराज झाले आहेत. त्यामुळेच ते निराधार वक्तव्य करत आहेत' अशी टीकाही शर्मा यांनी केले.

नोटाबंदीच्या निर्णयानंतर राहुल गांधी वारंवार मोदी यांना लक्ष्य करत आहेत. मोदी यांचा निर्णय हा गरीब, शेतकरी आणि सर्वसामान्यांविरुद्ध असल्याची टीका ते करत आहेत. यंदाचे हिवाळी अधिवेशनही नोटाबंदीच्या मुद्यावरून वारंवार तहकूब झाले होते.

Web Title: Rahul Gandhi must respect democracy : BJP