
Rahul Gandhi Nightclub Video : 'चहाच्या भांड्यात बिअर...', TMC खासदारानं भाजपला सुनावलं
नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा नेपाळमधील काठमांडू येथील नाईट क्लबमधील व्हिडिओ (Rahul Gandhi Nightclub Video) सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भाजपने हा व्हिडिओ शेअर करत काँग्रेसवर (Congress) निशाणा साधला आहे. त्यावरून तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा (TMC MP Mahua Moitra) यांनी भाजपच्या नेत्यांना चांगलंच फटाकरलं आहे. राहुल गांधी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात काय करतात? हे बघणे तुमच काम नाही, असं मोईत्रा म्हणाल्या.
हेही वाचा: नेपाळच्या नाईटक्लबमध्ये दिसले राहुल गांधी, व्हिडिओ शेअर करत भाजपची टीका
राहुल गांधी किंवा इतर कोणीही नाईट क्लब, त्यांच्या खासगी वेळेत किंवा लग्नाच्या पार्टीत काय करतात? यावर बोलण्याचा कोणालाही अधिकार नाही. भाजपचे ट्रोल आर्मीचे प्रभारी आजारी असून त्यांनी जे चांगलं करतात ते करत राहायला हवं. ते चहाच्या भांड्यात बिअर घेऊन दुहेरी जीवन जगत आहेत, असं मोईत्रा आपल्या ट्विटमध्ये म्हणाल्या.
भाजपची टीका काय?
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी सध्या नेपाळ दौऱ्यावर आहेत. त्यांचा नाईटक्लबमध्ये पार्टी करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर भाजप आयटी-सेलचे प्रभारी मालवीय यांनी हा व्हिडिओ शेअर करत काँग्रेस आणि राहुल गांधींवर टीका केली. मुंबईत हल्ला झाला तेव्हा देखील राहुल गांधी क्लबमध्येच होते आणि आता त्यांच्या पक्षातील वातावरण बिघडलं असताना देखील ते क्लबमध्येच आहेत, असं मालवीय म्हणाले. त्यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. किरण रिजजू यांनी देखील व्हिडिओ शेअर करत राहुल गांधींची पार्टी, दौरे, क्लब हे देशाला काही नवीन नाही, असं म्हटलं आहे.
काँग्रेसचं उत्तर काय? -
भाजपने राहुल गांधींचा व्हिडिओ शेअर करून ट्रोल करण्यास सुरुवात करताच काँग्रेसची प्रतिक्रिया समोर आली आहे. राहुल गांधी एका पत्रकार मित्राच्या लग्नाला गेले होते. एखाद्या व्यक्तीने स्वतःच्या खासगी वेळेत लग्न समारंत्रास उपस्थित राहणे काही गैर आहे का? असा सवाल काँग्रेसकडून उपस्थित करण्यात आला आहे.
Web Title: Rahul Gandhi Nightclub Video Mahua Moitra Attack On Bjp
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..