राहुल गांधींनी घातला पित्याप्रमाणे बंद गळ्याचा कोट..!

वृत्तसंस्था
बुधवार, 30 ऑगस्ट 2017

कुर्त्याच्या बाह्या ते दुमडत असल्याचेही अनेकदा दिसले आहे. काही प्रसंगी राहुल गांधी जीन्स व टी शर्टमध्ये पाहायला मिळाले. पण बंद गळ्याच्या सुटातील हे त्यांचे पहिलेच छायाचित्र असावे, असे सांगण्यात आले

नवी दिल्ली - कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे कायम पांढरा कुर्ता- पायजमा या वेशभूषेत दिसतात. पण सध्या नॉर्वेच्या दौऱ्यावर असलेल्या राहुल यांनी वडील व दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याप्रमाणेच बंद गळ्याचा कोट घातला होता.

नॉर्वे सेंट्रल बॅंकच्या प्रमुखांची राहुल गांधी यांनी भेट घेऊन चर्चा केली. त्या वेळी त्यांनी बंद गळ्याचा सूट घातला होता. या भेटीची माहिती राहुल यांच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवर देण्यात आली आहे. यासोबत असलेल्या छायाचित्रात राहुल सुटामध्ये दिसत आहे. यात ते राजीव गांधीसारखे दिसत असून बसण्याची पद्धतही वडिलांप्रमाणेच आहे. जाहीर सभांमध्ये बहुतेक वेळा कुर्ता- पायजमा असा राहुल यांचा वेश असतो.

कुर्त्याच्या बाह्या ते दुमडत असल्याचेही अनेकदा दिसले आहे. काही प्रसंगी राहुल गांधी जीन्स व टी शर्टमध्ये पाहायला मिळाले. पण बंद गळ्याच्या सुटातील हे त्यांचे पहिलेच छायाचित्र असावे, असे सांगण्यात आले.

नॉर्वेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या निमंत्रणावरुन राहुल गांधी हे नॉर्वेतील ओस्लो दौऱ्यार गेले आहेत. यामुळे राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्या नेतृत्वाखाली पाटणा येथे नुकत्याच झालेल्या विरोधी पक्षांच्या एकता मेळाव्यास ते अनुपस्थित होते. त्यावरुन अनेक प्रश्‍न उपस्थित केले गेले.

Web Title: rahul gandhi rajiv gandhi norway