खोटे आणि द्वेषाने केला मोदींनी प्रचार : राहुल गांधी

वृत्तसंस्था
शनिवार, 8 जून 2019

अमेठीतून पराभव झालेल्या राहुल गांधी यांना वायनाडमधून मोठे मताधिक्य मिळाले होते. राहुल गांधी हे सध्या मतदारांचे आभार मानण्यासाठी वायनाड दौऱ्यावर आहेत. कालपेटा भागातील कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी मोदींचे राजकारण द्वेषावर आधारित असल्याचे म्हटले आहे.

वायनाड : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खोटे आणि द्वेषाचा वापर करून प्रचार केला. तरीही आम्ही त्यांना प्रेमानेच उत्तर देऊ असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

अमेठीतून पराभव झालेल्या राहुल गांधी यांना वायनाडमधून मोठे मताधिक्य मिळाले होते. राहुल गांधी हे सध्या मतदारांचे आभार मानण्यासाठी वायनाड दौऱ्यावर आहेत. कालपेटा भागातील कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी मोदींचे राजकारण द्वेषावर आधारित असल्याचे म्हटले आहे. राहुल गांधी यांनी दोन दिवस रोड शो केला.

राहुल गांधी म्हणाले, की लोकसभा निवडणुकीत भाजपने खोटे आणि द्वेषाचा वापर केला. तर, काँग्रेसने फक्त त्यांना प्रेमानेच उत्तर दिले. यापुढेही आमची भूमिका हिच राहिल. आम्ही आमच्या भूमिकेशी यापुढेही कायम राहू.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rahul Gandhi road show in Wayanad says pm Modi poll campaign filled with lies and hatred