आरएसएसमध्ये महिलांना स्थान मिळाले तर... : राहुल गांधी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

दिल्ली : देशात महिलांची संख्या 50 टक्के आहे, त्यांच्यात देश चालविण्याची क्षमता देखील आहे. त्यामुळेच येणाऱ्या काळात महिला काँग्रेसचा झेंडा देशभर फडकताना दिसेल. काँग्रेस पक्षात महिलांना 50 टक्के प्रतिनिधीत्व देण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे मत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केले. 

दिल्लीत सुरू असलेल्या महिला काँग्रेसच्या संमेलनात राहुल गांधी बोलत होते. यावेळी राहुल गांधी यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (आरएसएस) जोरदार टिका केली. महिला देश चालवू शकत नाहीत अशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस)ची धारणा आहे. भाजपचा रिमोट कंट्रोल ज्यांच्या हातात आहेत त्या आरएसएसमध्ये महिलांना स्थान नाही. ज्या दिवसी या संघटनेत महिलांना स्थान मिळेल तेव्हा आरएसएस आरएसएस राहणार नाही, असे राहुल यांनी म्हटले आहे.

राहुल गांधी म्हणाले, ''उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड यांसह अनेक राज्यात महिलांवर अत्याचार होत आहेत. मात्र, बुलेट ट्रेनवर बोलणारे मोदी अशावेळी एक शब्द काढत नाहीत. महिला सक्षमीकरणाबाबत भाजप आणि आरएसएसची विचारधारा वेगळी आहे असून,  आगामी काळात काँग्रेस पक्षात महिलांना 50 टक्के स्थान असेल. संघात महिलांना दरवाजे कायमचे बंद असतात. काँग्रेस आणि त्यांच्या संस्कृतीत हाच फरक आहे.''

Web Title: Rahul Gandhi said If women get in RSS