'चौकीदारा'ने एका रात्रीत सीबीआयच्या संचालकांना हटवले : राहुल गांधी

Congress President Rahul Gandhi Says Chowkidar Modi Removed Alok Verma Overnight to Stall Rafale Probe.
Congress President Rahul Gandhi Says Chowkidar Modi Removed Alok Verma Overnight to Stall Rafale Probe.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) संचालक अलोक वर्मा यांना एका रात्रीत हटवले. अलोक वर्मा राफेल कराराची कागदपत्रे जमा करत होते. त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले, अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. तसेच सध्या देश आणि संविधान धोक्यात आहे, असेही ते म्हणाले.

- काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी राजस्थानातील झलावर येथे जाहीर सभेत बोलत होते.

- राहुल गांधी यांच्या भाषणातील ठळक मुद्दे : - 

- विजय मल्ल्या 9 हजार कोटींचा गैरव्यवहार केला.

- यूपीए सरकारने 35 कोटी रुपये खर्च करून गरिबांना रोजगार दिला.

- मोदींनी संसदेत मनरेगा योजना फेल आहे, असे सांगितले होते.

-  नीरव मोदी, ललित मोदी आणि नरेंद्र मोदी नावं सारखीच आहेत.

- मात्र, नीरव मोदी 35 हजार कोटी रुपये घेऊन पलायन करतो.

- चौकीदार चोर है, अशा घोषणाही देण्यात आल्या.

- सीबीआयचा संचालक राफेल कराराची कागदपत्रांची मागणी करतो.

- फ्रान्सच्या राष्ट्रपतींनी सांगितले, की आम्हाला सांगण्यात आले होते, जर राफेलचे करार हवे असल्यास अनिल अंबानींना द्यायला हवे.

- शेतकऱ्यांनो तुमचे कर्जमाफ होऊ शकत नाही. अनिल अंबानींचे 45 हजार कोटींचे कर्ज आहे.

- हे सर्व काम कोणी केले तर चौकीदाराने.

- मित्रो, मला भागीदार बनवू नका तर चौकीदार बनवा, अशा शब्दांत त्यांनी मोदींवर त्यांच्याच शैलीत खिल्ली उडवली.

- मोदीजी, आपल्याला बँकेच्या रांगेत उभे करतील मात्र, या रांगेत अनिल अंबानी यांसारखे मोठे लोकं दिसणार नाहीत.

- 45 हजार कोटी अनिल अंबानींना देण्यात आले होते.

- रोजगार, 15 लाख कोटींचे आश्वासने देण्यात आले होते. ते पूर्ण झाले का?

- मोदींनी सांगितले होते, की 2 कोटी तरुणांना रोजगार देण्यात येईल, खरंच हे मिळाले का?

- सरकारी कर्मचारी संपूर्ण राज्यात निषेध करत आहेत.

- पेट्रोलच्या दरात संपूर्ण जगात कपात झाली. मात्र, भारतात पेट्रोलचे दर वाढतच आहेत.

- यापूर्वी गॅस मिळत होता आता तोही नीट मिळत नाही.

- तुमचे कर्ज माफ होणार नाही.

- 35 हजार कोटींनी काँग्रेस पक्षाने करोडो लोकांना रोजगार दिला. 

- मी पंतप्रधान बनण्यापूर्वी हत्ती झोपेत होता, असे विधान मोदींनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे देशातील अनेकांचा अपमान झाला.

- पत्रकारांनो घाबरू नका. तुमच्यात मोठी शक्ती आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com