
Rahul Gandhi : मुस्लिम लीग हा पूर्णपणे सेक्युलर पक्ष; राहुल गांधींच्या विधानाने खळबळ
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यारवर असतानां राहुल गांधी यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच अनेक प्रश्नांची उत्तरे देखील दिली आहेत. यादरम्यान त्यांनी मुस्लीम लीग धर्मनिरपेक्ष असल्याचे म्हटले आहे. राहुल गांधी यांना वॉशिंग्टन डीसी येथे नॅशनल प्रेस क्लबमध्ये आयोजित एका कार्यक्रमात केरळ येथील मुस्लिम लीगसोबतच्या युतीविषयी प्रश्न विचारण्यात आला होता.
मुस्लिम लीगबद्दल बोलताना राहुल गांधी यांनी त्यामध्ये नॉन-सेक्युलर असं काही नसल्याचे म्हटले आहे. मुस्लिम लीग हा पूर्णपणे सेक्युलर पक्ष आहे असे राहुल गांधी म्हणाले. इंडियन यूनियन मुस्लिम लीक केरळ येथील पक्ष असून तो काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफ मधील पारंपारिक सहयोगी पक्ष आहे. या युतीविषयी प्रश्न विचारण्यात आल्यानंतर राहुल गांधी यांनी हे वक्तव्य केलं आहे.
अमेरिकेत राहुल गांधी यांनी केलेल्या विधानांमुळे देशातील राजकीय वातवरण थापलं आहे. मुस्लिम लीगला सेक्युलर घोषीत केल्यानंतर भाजपने त्यांच्या विधानाचा निषेध व्यक्त केला आहे. भाजपचे नेते अमित मालवीय यांनी वायनाड मध्ये स्वतःची स्वीकारार्हता टीकवून ठेवण्यासाठी राहुल गांधी यांनी अपरिहार्यतेतून मुस्लिम लीगला धर्मनिरपेक्ष म्हटलं आहे.
दरम्यान राहुल गांधी यांनी अमेरिकेत पीएम मोदी २०२४ ची लोकसभा निवडणूक जिंकणार नाहीत असा दावा केला आहे. ते म्हणाले की, हे इतकं सोप नाही जितकं लोक समजत आहेत. विरोधीपक्ष एकत्र येऊन भाजपला पराभूत करेल. आगामी निवडणूकीत काँग्रेस सर्वाना आश्चर्यचकित करेल असेही राहुल गांधी म्हणाले.