मोदींच्या राज्यात कष्टकऱ्यांना सन्मान नाही - राहूल गांधी 

वृत्तसंस्था
सोमवार, 11 जून 2018

मोदी सरकारच्या राज्यात कष्टकरी वर्गाचा सन्मान होत नाही. ओबीसी समुदायात मोठ्या प्रमाणात कुशल लोक आहेत. परंतु, मोदींच्या राज्यात त्यांची काहीच किंमत केली जात नाही. असे उद्गार काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिल्लीत तालकटोरा येथील सभागृहात ओबीसी समुदायाला संबोधित करत असताना काढले. 

नवी दिल्ली - मोदी सरकारच्या राज्यात कष्टकरी वर्गाचा सन्मान होत नाही. ओबीसी समुदायात मोठ्या प्रमाणात कुशल लोक आहेत. परंतु, मोदींच्या राज्यात त्यांची काहीच किंमत केली जात नाही. असे उद्गार काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिल्लीत तालकटोरा येथील सभागृहात ओबीसी समुदायाला संबोधित करत असताना काढले. 

राहुल गांधी म्हणाले की, केंद्रातील मोदी सरकार हे दुसऱ्यांच्या कामाचे श्रेय घेणारे सरकार आहे. देशातील मुठभर श्रीमंत लोकांसाठी काम करणारे हे सरकार आहे. ज्यांच्या जवळ कौशल्य आहे, जे कष्टाचे काम करतात त्यांना मोदींच्या राज्यात सन्मान मिळत नाही, मोदी सरकार देशातील केवळ श्रीमंत लोकांसाठी काम करत आहे. 

शेतकरी आत्महत्या करत आहेत मात्र, त्यांची कर्जे माफ केली जात नाहीत. मोदींच्या कार्यालयात शेतकरी कधीच दिसणार नाहीत, त्यांनी आत्महत्या केल्या तरी त्यांचे कर्ज माफ होणार नाही. उलट केवळ श्रीमंत लोकांचेच कर्ज माफ केले जाते.

त्याचबरोबर, काँग्रस पक्ष सत्तेत आल्यावर ओबीसींना त्यांचे हक्क मिळवून देईल, सत्तेत येऊन आपल्याला एकमेकांसोबत काम करायचे आहे, असे आवाहन यावेळी राहुल गांधी यांनी ओबीसी समुदयाला केले.

Web Title: Rahul Gandhi says skilled workers are not rewarded in Modi’s India