पंतप्रधान बनण्यास तयार : राहुल गांधी 

Rahul Gandhi
Rahul Gandhi

नवी दिल्ली : सर्व घटक पक्षांची इच्छा असल्यास मी पंतप्रधान बनण्यास तयार असल्याचे कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सांगत आपली उमेदवारी घोषित केली. मात्र, आधी सर्व पक्षांनी एकत्र येणे आणि भाजपला हरविणे, हे प्रथम उद्दिष्ट असल्याचेही राहुल यांनी स्पष्ट केले. 

‘‘आमची मित्रपक्षांबरोबर चर्चा झाली आहे. ही दोन टप्प्यांमधील प्रक्रिया आहे. एकत्र येणे आणि भाजपला हरविणे हा पहिला टप्पा असून, निवडणुकीनंतर पुढील निर्णय घेतले जातील. पण सर्व घटक पक्षांची मी पंतप्रधान व्हावे, अशी इच्छा असल्यास मी तयार आहे,’’ असे राहुल गांधी म्हणाले.

नेतृत्व ही सतत बदलणारी आणि तुम्हाला शिकविणारी प्रक्रिया असून माझ्यासंदर्भात, मी लोकांचे म्हणणे अधिक प्रमाणात ऐकतो आणि त्यांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करतो, असे गांधी म्हणाले. नेतृत्वाच्या बाबतीत मी आई सोनिया गांधी यांच्याकडून बरेच काही शिकलो असून, त्यांनी मला संयम राखण्याचा मोलाचा सल्ला दिला असल्याचेही राहुल यांनी सांगितले. राहुल यांनी या कार्यक्रमामध्ये विविध राजकीय प्रश्‍नांवर उत्तरे दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com