मोदीजी, मी वैयक्तिक टीका कधीही करणार नाही: राहुल गांधी

वृत्तसंस्था
गुरुवार, 3 मे 2018

राहुल गांधी यांनी आज औरद येथे प्रचारसभा घेतली त्यावेळी ते बोलत होते. कर्नाटक विधानसभा निवडणुकाच्या प्रचाराचा बिगुल वाजला असून, येत्या 12 मे रोजी कर्नाटक विधानसभेसाठी मतदान होईल.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जेव्हा जेव्हा घाबरतात तेंव्हा तेंव्हा वैयक्तीक टीका करतात. त्यांनी माझ्यावर कितीही वैयक्तिक टीका केली तरी, मी त्यांच्यावर कधीही वैयक्तिक टीका करणार नाही. कारण, ते माझे पंतप्रधान आहेत, असे वक्तव्य काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (गुरुवार) प्रचारसभेदरम्यान केले.

राहुल गांधी यांनी आज औरद येथे प्रचारसभा घेतली त्यावेळी ते बोलत होते. कर्नाटक विधानसभा निवडणुकाच्या प्रचाराचा बिगुल वाजला असून, येत्या 12 मे रोजी कर्नाटक विधानसभेसाठी मतदान होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज (गुरुवार) पासून प्रचारमोहिमेत सहभागी होणार आहेत.

राहुल गांधी म्हणाले, की भाजप आणि काँग्रेसमधील ही लढाई दोन विचारांमधील आहे. एकीकडे काँग्रेस आहे जी प्रेमाची शांततेची भाषा बोलत आहे. कर्नाटकला जोडण्याचा विचार करत आहे, तर दुसरीकडे भारतीय जनता पक्ष आहे जो द्वेषाची भाषा करत आहे, कर्नाटकला तोडण्याचा विचार करत आहे. कर्नाटकच्या मुळ विचारांशी भारतीय जनता पक्षाला काही देणे-घेणे नाही, त्यांनी फक्त निवडणुक जिंकायची आहे. परंतु, काँग्रेसने आपली 90% आश्वासने पाळली आहेत. सिद्धरमैय्या यांनी शेतकऱ्यांचे 8000 करोड रुपयांचे कर्ज माफ केल्यावर मोदींनी किमान मोठ्या मनाने केंद्राकडून 2000 कोटी रुपयांची तरी मदत करायला हवी होती.

Web Title: Rahul Gandhi says wont make personal remarks against the prime minister